Home » ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य » खलिस्तानवाद्यांशी कॉंग्रेसची हातमिळवणी

खलिस्तानवाद्यांशी कॉंग्रेसची हातमिळवणी

=सुखबीरसिंग बादल यांचा गंभीर आरोप=
sukhbirsingh-badal1नवी दिल्ली, [२१ नोव्हेंबर] – केंद्रासह अनेक राज्यांमधील सत्तेपासून बाहेर फेकल्या गेलेल्या कॉंगे्रस पक्षाने देशवासीयांवर सूड उगविण्यासाठी पंजाबमध्ये पुन्हा एकदा १९८० च्या दशकातील दहशतवादाला जिवंत करण्याचा कट रचला आहे. अमृतसरमध्ये अलीकडेच फुटीरतावाद्यांच्या मेळाव्यात कॉंगे्रसचे अनेक नेते उपस्थित होते आणि खलिस्तानच्या मागणीला त्यांनी पाठिंबाही दिला, असा घणाघाती आरोप पंजाबचे उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांनी आज शनिवारी येथे केला.
राजधानी दिल्लीत पत्रपरिषदेला संबोधित करताना बादल म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंगे्रस पक्षाने पंजाबात दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्याचे धोरण स्वीकारले आहे. खलिस्तानसमर्थक दहशतवादी नेत्यांच्या इशार्‍यावर राहुल गांधी काम करीत आहेत. त्यांच्याच विश्‍वासातल्या काही नेत्यांनी १० नोव्हेंबर रोजी खलिस्तानवाद्यांच्या रॅलीत सहभागी होऊन त्यांच्या मागणीला पाठिंबाही दिला होता. या रॅलीत अनेकांनी खलिस्तानच्या मागणीचे झेंडेही फडकावले होते. या रॅलीत ज्या लोकांना जत्थेदार बनविण्यात आले, ते अतिरेकी पार्श्‍वभूमीचे असल्याने राहुल गांधी यांनी आता अतिरेक्यांशी हातमिळवणी केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कॉंगे्रस पक्षाला शांतता मान्यच नसल्याने या पक्षाने पंजाबला पुन्हा एकदा १९८० च्या दशकातील दहशतवादाकडे नेण्याची मोहीमच हाती घेतली आहे. या मुद्यावर आपण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली आणि कॉंगे्रसविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. या पक्षाची मान्यता रद्द करणे देशाच्या हिताचे ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिरावर हल्ला चढविला होता. राजीव गांधी यांनी शीखविरोधी दंगली घडविल्या होत्या आणि आता राहुल गांधी फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी करून देशात दहशतवाद पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. या मुद्याकडे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचेही लक्ष वेधण्यासाठी आपल्या सरकारने एक पत्र लिहिले असल्याचे त्यांनी सांगितले. कॉंगे्रसच्या वरिष्ठ नेत्यांचे पाकिस्तानच्या आयएसआयसोबतही संबंध असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25630

Posted by on Nov 22 2015. Filed under ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, पंजाब-हरि, राज्य (1186 of 2452 articles)


=गुप्तचर यंत्रणांचा इशारा= नवी दिल्ली, [२१ नोव्हेंबर] - पाकपुरस्कृत लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना जम्मू-काश्मिरातील शाळा, लष्करी तळं आणि सीमा सुरक्षा ...

×