Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » चीनकडे शत्रुत्वाच्या भावनेने पाहणे अयोग्य

चीनकडे शत्रुत्वाच्या भावनेने पाहणे अयोग्य

=हवाई दल प्रमुखांचे आश्‍चर्यकारक वक्तव्य=
Air Chief Marshal Arup Rahaहाशिमरा, [२९ नोव्हेंबर] – भारताने चीनकडे शत्रू म्हणून पाहणे थांबवावे. दोन्ही देशांची उदिष्टे समान असल्याने समन्वयाने निर्णय घ्यावयास हवे, असे मत भारतीय हवाई दल प्रमुख अरूप राहा यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या वक्तव्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पश्‍चिम बंगालमधील अलिपूरदौर जिल्ह्यात रविवारी राहा यांना चीनने दिलेल्या धमकीविषयी विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले, दोन्ही देशात संघर्ष आहे, सीमा आहेत, मान्य आहे, तरी मला वाटते की, आपण चीनकडे राजकीय, मुत्सद्दी दृष्टिकोनातून पाहावयास हवे. दोन्ही देशांच्या समन्वयातून अनेक प्रश्‍नांवर तोडगा निघेल, उद्दिष्टपूर्तीसाठी मदत होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
भारताच्या सीमेवर चीनचा हस्तक्षेप वाढला आहे. याचा मुकाबला करण्याचे आव्हान भारतासमोर आहे. चीन हा श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि म्यानमार या देशांना आर्थिक व लष्करी पातळीवर मदत करत असल्याचा अहवाल राहा यांनी मागील महिन्यातच सादर केला होता. या अहवालाच्या आणि चीनच्या आततायीपणाच्या पार्श्‍वभूमीवर राहा यांच्या या वक्तव्याबाबत सखेद आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=25846

Posted by on Nov 30 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1118 of 2450 articles)


=१० डिसेंबरपर्यंत राज्यसभेला सादर करणार= नवी दिल्ली, [२९ नोव्हेंबर] - तब्बल एक वर्ष वादळी चर्चा केल्यानंतर लोकपालवरील संसदीय समितीने भ्रष्टाचारविरोधी ...

×