richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » जीएसटी वगळता अन्य सहा विधेयकांवर एकमत

जीएसटी वगळता अन्य सहा विधेयकांवर एकमत

=हमीद अन्सारी यांनी बोलावली होती सर्वपक्षीय बैठक=
sansad1नवी दिल्ली, [१८ डिसेंबर] – उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांनी आज बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीत जीएसटीवर कोणतेही मतैक्य होऊ शकले नाही.
विरोधक विशेषत: कॉंग्रेसचे सदस्य घालत असलेल्या गोंधळामुळे राज्यसभेत या आठवड्यात कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. कॉंग्रेसच्या सदस्यांच्या वागणुकीमुळे सभागृहाचे कामकाज होऊ शकत नसल्याबद्दल हमीद अन्सारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच सरकार आणि विरोधक यांच्यात निर्माण झालेली कोंडी फोडून सभागृहाचे कामकाज सुरळीत व्हावे म्हणून हमीद अन्सारी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीला सभागृहाचे नेते आणि अर्थमंत्री अरुण जेटली, संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माकपचे नेते सीताराम येचुरी यांच्यासह सर्वपक्षांचे गटनेते उपस्थित होते.
या बैठकीत जीएसटीवर एकमत झाले नसले तरी पुढील आठवड्यात अनुसूचित जाती जनजाती विधेयकासह सहा विधेयके पारित करण्यावर सहमती झाली. जीएसटी विधेयक पारित करावे, अशी विनंती जेटली यांनी या बैठकीत केली. बैठक चांगली झाली, असे सभापती हमीद अन्सारी यांनी बैठकीनंतर सांगितले.
बैठकीत अनेक मुद्यांवर सार्थक चर्चा झाल्याचे नकवी यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले. सभागृहात कामकाज होत नसल्याबद्दल अनेक पक्षांच्या सदस्यांनी चिंता व्यक्त केली. पुढील आठवड्यात जास्त वेळ बसून प्रलंबित विधेयके पारित करण्याची तयारी सर्वपक्षीय सदस्यांनी दर्शवली, असे नकवी यानी सांगितले.
महागाई, देशातील दुष्काळी स्थिती, असहिष्णुता, अरुणाचल प्रदेश आदी मुद्यांवर सभागृहात चर्चा करण्यावरही बैठकीत एकमत झाले.
सभागृहात गोंधळ घालणार्‍या सदस्यांवर कारवाई करण्याचा अधिकार सभापतींना देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली का या प्रश्‍नावर अशी कोणतीही चर्चा झाली नाही, असे नकवी यांनीसांगितले.
एससीएसटी विधेयकासह काही विधेयके पारित करू देण्यावर आमचे एकमत झाले, जीएसटी विधेयकावर मात्र या बैठकीत चर्चा झाली नाही, असे आझाद यांनी सांगितले.
या सर्वपक्षीय बैठकीमुळे आता सरकारसाठी प्रतिष्ठेचा विषय असलेले जीएसटी विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पारित होण्याची शक्यता मावळली आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26213

Posted by on 4:40 pm. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google