Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » तेजस्वी, तेजप्रतापसाठी लालूंच्या विश्‍वासू अधिकार्‍यांची बदली

तेजस्वी, तेजप्रतापसाठी लालूंच्या विश्‍वासू अधिकार्‍यांची बदली

tejasvi-yadav-tejpratap-yadavनवी दिल्ली, [२६ नोव्हेंबर] – बिहारच्या नितीशकुमार मंत्रिमंडळात सहभागी झालेले लालू पुत्रद्वय तेजस्वी व तेजप्रताप यांना सहकार्य व मार्गदर्शन करण्यासाठी लालूंच्या विश्‍वासातील येथील काही आयएएस अधिकार्‍यांची बिहारमध्ये बदली करण्यात आल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रकाशित केले आहे.
उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळणारे तेजस्वी यादव यांच्याकडे रस्ते निर्माण व तेजप्रतापकडे राज्याच्या आरोग्य खात्यासह अन्य दोन मंत्रालयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहेत. या वृत्तानुसार सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार १९८२ च्या तुकडीचे सुधीरकुमार यांची बदली रस्ते निर्माण विभागाचे मुख्य सचिव म्हणून करण्यात आली असून ते अरुणकुमारसिंह यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारतील. याशिवाय १९८७ च्या तुकडीतील आर. के. महाजन यांना शिक्षण विभागातून हटवून आरोग्य खात्याचे मुख्य सचिव म्हणून पाठवण्यात आले आहे. तसेच १९८९ च्या तुकडीतील ब्रजेश मल्होत्रा यांनाही आरोग्य मंत्रालयात पाठवण्यात आले आहे.
हे अधिकारी लालूप्रसाद यादव यांच्या अतिविश्‍वासातील असल्याचे सांगण्यात येते. लालू रेल्वेमंत्री असताना तर महाजन यांना रेल्वे मंत्रालयात कार्यकारी संचालक म्हणून नेमण्यात आले होते.
याशिवाय नितीशकुमार यांनी पाचव्यांदा मुख्यमंत्री बनल्यानंतर प्रशासनात पहिल्यांदाच काही बदल केले असून सुधीरकुमार राकेश यांच्या जागी आमिर सुभानी यांना गॄह सचिव नेमले आहे. तसेच अरुणकुमारसिंह यांना जलसंाधन मंत्रालयात, कृषी उत्पादन आयुक्त विजयप्रकाश यांना सतर्कता विभागाचा अतिरिक्त कार्यभार, तर मुख्यमंत्र्यांचे सचिव असलेले डी. एस. गंगवार यांना शिक्षण विभागाचीही अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25761

Posted by on Nov 27 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1142 of 2452 articles)


=रशियन दिग्दर्शक निकिता मिखालकोव्ह यांचे गौरवोद्‌गार= पणजी, [२६ नोव्हेंबर] - रशियामध्ये भारतीय चित्रपटांचा खूप प्रभाव असल्यानेच ते पाहण्यासाठी रांगा लागायच्या. ...

×