richwood
richwood
richwood
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » नरेंद्र मोदींकडे भारताबाबत स्पष्ट दृष्टिकोन

नरेंद्र मोदींकडे भारताबाबत स्पष्ट दृष्टिकोन

=ओबामांची स्तुतिसुमने=
modi-obama1वॉशिंग्टन, [३ डिसेंबर] – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत प्रामाणिक राजकीय नेते असून, आपल्या देशासाठी त्यांच्याकडे स्पष्ट व्हिजन आहे, या शब्दात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मोदींची स्तुती केली आहे. पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा यांची अनेकदा भेट झाली आहे, हे विशेेष.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रामाणिक आणि स्पष्टवक्ते असल्याचे अध्यक्ष ओबामा यांचे मत आहे. शिवाय मोदींना सत्य परिस्थिती, तसेच भारतासमोर व द्विपक्षीय संबंधांमध्ये असलेल्या अडचणींची स्पष्ट जाणीव आहे असेही ओबामांना वाटते, असे व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव जोश अर्नेस्ट यांनी बुधवारी आपल्या दैनंदिन पत्रपरिषदेत बोलताना सांगितले. सोमवारीच पंतप्रधान मोदी आणि ओबामा यांची हवामान बदलांबाबत पॅरिस येथे आयोजित परिषदेदरम्यान भेट झाली होती. सप्टेंबर २०१४ मध्ये पहिल्यांदा व्हाईट हाऊस येथे भेटल्यानंतर उभय नेत्यांमध्ये झालेली ही सहावी भेट होती.
आपल्या देशाला नेमके कुठे घेऊन जायचे आहे, यासंबंधीचा स्पष्ट दृष्टिकोन (व्हिजन) नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. ते केवळ प्रभावी राजकारणीच नव्हे, तर तेवढेच प्रभावी पंतप्रधानदेखील आहेत. त्यामुळेच बराक ओबामा पंतप्रधान मोदींचा आदर करतात. शिवाय राजकारणी म्हणून त्यांचे कौशल्य आणि क्षमतेलाही दाद देतात. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचे नेतृत्व करण्याची कठीण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. हे काम वाटते तितके सोपे नाही आणि याचा अध्यक्ष बराक ओबामा यांना प्रत्यक्ष अनुभव आहे, असेही अर्नेस्ट यांनी सांगितले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=25980

Posted by on 5:21 am. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google