Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » नितीशकुमार दबावात आहेत : मांझी

नितीशकुमार दबावात आहेत : मांझी

JITAN_RAM_MANJHIपाटणा, [२३ मे] – मुख्यमंत्री नितीशकुमार हे प्रचंड दबावात काम करीत आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसह अन्य आघाड्यांवर ते सातत्याने अपयशी ठरत आहेत, अशी टीका बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी आज सोमवारी केली.
राज्यात सर्वत्र हत्यांचे सत्र सुरू आहे. पण, गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्याचे धाडस नितीशकुमार यांच्यात नाही. २००५ ते २०१३ या काळात नितीशकुमार सरकारचे काम चांगले होते. पण, आता त्यांच्या हातात काहीच राहिले नाही. प्रशासनाचा इतका दीर्घ अनुभव असल्याने ते आताही चांगले काम करू शकतात. पण, काही लोकांच्या दबावामुळे ते ‘नाकारा’ झाले आहेत, असे मांझी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तथापि, त्यांच्यावर दबाव टाकणारा नेता कोण आहे, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28449

Posted by on May 24 2016. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (280 of 2449 articles)


नवी दिल्ली, [२३ मे] - दैनंदिन जीवनात महत्त्वाचा घटक असलेला आणि रोज सकाळी घराघरात खाण्यात येणार्‍या ब्रेड आणि पावमध्ये कर्करोगाला ...

×