Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » निवडणुकीपूर्वी मायावतींना झटका

निवडणुकीपूर्वी मायावतींना झटका

=मौर्य यांचा बसपाला रामराम=
Mayawati4लखनौ, [२२ जून] – विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या उत्तरप्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बसपाला आज बुधवारी मोठा झटका बसला. पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती तिकिटांचा लिलाव करीत आहेत, असा आरोप करून वरिष्ठ नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी बोली लावली जात आहे. आता या पक्षात गुदमरल्यासारखे वाटत असल्याने येथे राहणे शक्य नाही. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे, असे मौर्य यांनी पत्रपरिषदेत बोलताना सांगितले.
दरम्यान, मौर्य बसपाचा राजीनामा देऊन सत्तारूढ समाजवादी पार्टीत प्रवेश करणार असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून येत होते. अखिलेश यादव मंत्रिमंडळातही त्यांना मंत्रिपद दिले जाणार असल्याचे बोलले जात असताना, आपण भविष्यातील दिशा लवकरच जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले.
बरे झाले : मायावती
मौर्य यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना मायावती म्हणाल्या की, बरे झाले, त्यांनी स्वत:च पक्ष सोडला. खर तर, राजीनामा देऊन त्यांनी माझ्या पक्षावर फार मोठे उपकार केले आहे. मी तिकिटांचा लिलाव करीत आहे, हा आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावा.
त्यांनी स्वत:सोबतच आपला मुलगा व मुलीकरिताही तिकीट मागितले होते. पण, मी नकार दिला होता. त्यामुळे ते बंडखोरीवर उतरले होते. त्यांनी जर राजीनामा दिला नसता, तर मी स्वत:च त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला असता, असेही मायावती यांनी पत्रकारांना सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28737

Posted by on Jun 23 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (191 of 2452 articles)


सेऊल, [२२ जून] - सोमवारी २५०० किमीची मारक क्षमता असलेल्या घातक क्षेपणास्त्राची चाचणी केल्यानंतर उत्तर कोरियाने आज बुधवारी आणखी दोन ...

×