richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी कॉंगे्रस अडचणीत

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी कॉंगे्रस अडचणीत

national-herald-case-developments-lead-catch-newsनवी दिल्ली, [१२ डिसेंबर] – नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून संसदेला वेठीस धरणारा कॉंगे्रस पक्ष आता चांगलाच अडचणीत आला आहे. कॉंगे्रसचे वरिष्ठ नेते आणि असोसिएट जर्नलचे अध्यक्ष मोतीलाल व्होरा यांनी आम्हाला अंधारात ठेवून कंपनीचे शेअर्स यंग इंडियाला हस्तांतरित केल्याचा आरोप दहा भागधारकांनी केला आहे. विशेष म्हणजे, प्रख्यात वकील प्रशांत भूषण यांनीही अशीच भूमिका मांडली होती.
कोणत्याही भागधारकाला पूर्वकल्पना न देता, त्यांचे शेअर्स दुसर्‍या कंपनीत हस्तांतरित करणे हा गुन्हा असून, याविरोधात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे प्रशांत भूषण यांनी स्पष्ट केले आहे. यानंतर काही तासांतच असोसिएट जर्नलमध्ये मालकी हक्क ठेवणारे सुमारे दहा भागधारक शेअर्स हस्तांतरणाच्या विरोधात समोर आले आहेत. मोतीलाल व्होरा आणि असोसिएट जर्नलच्या अन्य संचालकांनी २०१० मध्ये कंपनीचे सर्वच समभाग यंग इंडिया प्रा. लिमिटेडच्या नावावर हस्तांतरित केले होते. असे करताना कंपनीने आमच्यापैकी एकाही भागधारकाची परवानगी घेतली नव्हती, असा त्यांचा आरोप आहे. या भागधारकांमध्ये कॉंगे्रसचे माजी खासदार विश्‍वबंधू गुप्त, मोहन मेकिन, व्यावसायिक ज्योत्स्ना सुरी यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, या भागधारकांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांचाही समावेश असून, त्यांचे आजोबा कैलासनाथ काटजू यांच्या नावावर असोसिएट जर्नलचे १३१ शेअर्स आहेत. असोसिएट जर्नल आणि यंग इंडिया या दोन कंपन्यांमध्ये नेमका काय व्यवहार झाला, याची माहिती आपल्याला नसल्याचे काटजू यांनी अलीकडेच स्पष्ट केले होते.
दरम्यान, या प्रकरणावरून कॉंगे्रसने गेल्या तीन दिवसांपासून संसदेचे कामकाज वेठीस धरले आहे. सरकार आपल्या विरोधकांवर राजकीय सूड उगवत असल्याचा आरोप पक्षाचे नेते कपिल सिब्बल यांनी केला आहे. तर, कायद्यापुढे कुणीही मोठा नाही, सर्व समान आहेत, अशी स्पष्ट भूमिका भाजपाने घेतली आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26155

Posted by on 4:28 am. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google