Home » ठळक बातम्या, बंगाल, राज्य » राहुल अजूनही बाल्यावस्थेतच!

राहुल अजूनही बाल्यावस्थेतच!

=तृणमूल महासचिवांचा हल्लाबोल=
PARTH CHATERJEEकोलकाता, [३ एप्रिल] – राहुल गांधी यांनी शनिवारी येथे एका प्रचारसभेत तृणमूल कॉंग्रेसवर टीका केल्यानंतर, राहुल गांधी अजूनही बाल्यावस्थेतच आहेत, अशा शब्दात तृणमूल कॉंग्रेसचे नेते आणि पक्षाचे महासचिव पार्थ चटर्जी यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.
राहुल गांधी बंगालमध्ये माकपाला मदत करण्यासाठी आले आहेत. परंतु, बंगाली जनता कॉंग्रेस आणि माकपा दोघांनाही त्यांची जागा दाखवून देईल. निवडणुकीनंतर जनतेच्या दृष्टीने कॉंग्रेसचे महत्त्व शून्य होईल, असेही ते यावेळी म्हणाले.
राहुल गांधी यांनी शनिवारी डाव्या नेत्यांसह मतदारांना संबोधित केले आणि आघाडी सरकारच्या स्थापनेचे आवाहन केले होते. पश्‍चिम बंगालमध्ये कॉंग्रेस आणि माकपा एकत्र निवडणूक लढवत आहेत, हे येथे उल्लेखनीय.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27685

Posted by on Apr 4 2016. Filed under ठळक बातम्या, बंगाल, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बंगाल, राज्य (535 of 2452 articles)


चेन्नई, [३ एप्रिल] - तामिळनाडू विधानसभा निवडणुकीकरिता माझ्या पक्षाने भाजपासोबत युती करण्याचा प्रयत्न केला होता. पण, भाजपानेच त्याला प्रतिसाद दिला ...

×