Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » रेल्वे करणार आता सौरऊर्जेचा वापर

रेल्वे करणार आता सौरऊर्जेचा वापर

=पंखे, वातानुकूलित यंत्रणा चालविणार=
solar-powered-trains - indian railwayजोधपूर, [१८ मे] – रेल्वेसाठी डिझेल आणि जीवाश्म इंधनाचा वापर वाढत असताना इंधनाची बचत होण्याच्या उद्देशाने रेल्वेतील पंखे, वातानुकूलित यंत्रणा आदी सुविधांसाठी सौरऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पॅसेंजर गाड्यांमधील सर्व प्रणाली सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज झाली आहे. या रेल्वेची प्रायोगिक तत्त्वावरील चाचणी या महिन्याच्या अखेरीस जोधपूरमध्ये लवकरच घेण्यात येणार आहे. सौर ऊर्जेच्या वापरामुळे प्रतिरेल्वे प्रतिवर्ष ८२ लाख रुपयांची बचत होणार असल्याचा अंदाज रेल्वेने व्यक्त केला आहे.
प्रायोगिक तत्त्वावरील रेल्वेमधील पंखे, दिवे व एसी बोगीवर बसवण्यात आलेल्या सोलर पॅनेलमधून निर्माण होणार्‍या सौर ऊर्जेवर चालतील. उत्तर-पूर्व रेल्वेचे प्रवक्ते गोपाळ शर्मा यांनी सोलर ट्रेन चाचणीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सोलर पॅनेलच्या वापरामुळे भारतीय रेल्वेला नेमका किती नफा होईल, हे चाचणी केल्यानंतरच स्पष्ट होईल. या पर्यायी ऊर्जेचा वापर केल्यास दरवर्षी प्रत्येक रेल्वेमागे अंदाजे ८२ लाख रुपयांची बचत होण्याची शक्यता रेल्वेने व्यक्त केली. सौर ऊर्जेचा वापर करण्यास सुरुवात केली तर इंधनाच्या खर्चात मोठी बचत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सौर ऊर्जेच्या वापरामुळे डिझेलचा वापर प्रतिवर्ष नव्वद हजार लिटरने कमी होऊ शकतो व कार्बन उत्सर्जन दोनशे टन प्रतिवर्ष एवढे कमी होऊ शकते. दिल्ली विभागांतर्गत रोहतक-रेवारी भागात धावणार्‍या रेल्वे गाड्यांमध्ये सीएनजीचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे मोठी आर्थिक बचत होत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28315

Posted by on May 18 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (324 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१८ मे] - काही महिन्यापूर्वीच दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील औरंगजेब रोडला दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचं ...

×