richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » रेल्वे प्रशासनाने आणला ‘ई-बेडरोल’

रेल्वे प्रशासनाने आणला ‘ई-बेडरोल’

TRAIN_e-bedrollमुंबई, [१० डिसेंबर] – आता लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी घरून चादर, उशी घेऊन जाण्याची गरज नाही. कारण आता रेल्वेतच ‘ई – बेडरोल’ उपलब्ध होणार आहे. मुख्य म्हणजे हा ‘बेडरोल’ तुम्ही घरीही घेऊन जाऊ शकता. त्यामुळे आता ‘ई – तिकीट सोबतच ई – बेडरोल’ही मिळणार आहे.
‘इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टूरिझम कॉर्पोरेशन’ ई – बेड रोलची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. यासाठी केवळ २५० रूपये मोजावे लागणार आहेत. यात एक चादर, दोन बेडशीट आणि एक उशी मिळणार आहे. त्यामुळे लांबच्या प्रवासाला जाताना हे सामान घरून घेऊन जाण्याची गरज नाही. मात्र या वस्तू घरी घेऊन जाता येणार आहे. ही सुविधा ऑनलाईन बुक करता येणार किंवा स्टेशनवर आयआरसीटीसीच्या कोणत्याही फूड प्लाझा, फास्ट फूड कॉर्नरवरून मिळवू शकता येणार आहे.
दरम्यान, सध्या नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन या दोन स्टेशनपासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. लवकरच ही सुविधा छत्रपति शिवाजी टर्मिनस, मुंबई आणि मुंबई सेंट्रल स्टेशनवरही उपलब्ध होणार आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26114

Posted by on 3:56 pm. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google