Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » व्याजदर कपातीची शक्यता नाही

व्याजदर कपातीची शक्यता नाही

=आरबीआयचे स्पष्ट संकेत=
RBI GATEनवी दिल्ली, [२३ नोव्हेंबर] – केंद्र सरकारच्या धडक पावलांमुळे आर्थिक सुधारणांना गती मिळाली असली आणि घाऊक व किरकोळ महागाईचा दर आजवरच्या सर्वोच्च नीचांकावर असला, तरी अमेरिकेची फेडरल बँक पुढील महिन्यात व्याजदरात वाढ करण्याची शक्यता असल्याने त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही पडणार आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतात व्याजदरात कपात होण्याची सध्या तरी कोणतीही शक्यता नसल्याचे संकेत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूत्राने दिले.
आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन पुढील महिन्यात पतधोरणाचा द्वैमासिक आढावा घेणार आहेत. महागाईचा कमी दर आणि आर्थिक सुधारणांची वाढलेली गती यामुळे ते पुन्हा एकदा व्याजदरात कपात करतील, अशी अपेक्षा उद्योग आणि गुंतवणूकदारांना होती. पुढील महिन्यात व्याजदरात ०.२५ टक्क्यांनी कपात होणार, अशी अपेक्षा शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांनाही होती. पण, या सर्वांचा अपेक्षाभंग होणार असल्याचे स्पष्ट संकेत प्राप्त झाले आहेत. तथापि, फेबु्रवारी महिन्यात घेण्यात येणार्‍या आढाव्यात पाव टक्क्यांची कपात अपेक्षित असल्याचे मतही सूत्राने व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, २९ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या पतधोरणाच्या द्वैमासिक आढाव्यात आरबीआयने प्रमुख कर्जांवरील व्याजदरात ०.५० टक्क्यांची कपात केली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25685

Posted by on Nov 24 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1169 of 2453 articles)


=अली जावेद यांचा पाकला घरचा अहेर= नवी दिल्ली, [२३ नोव्हेंबर] - मार्च १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील मुख्य सूत्रधार दाऊद ...

×