Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » सहारा समूहाला सुप्रीम कोर्टाचा दणका!

सहारा समूहाला सुप्रीम कोर्टाचा दणका!

=ऍम्बी व्हॅलीवर जप्ती
=लिलाव करून थकित कर्ज वसूल करा!
=३९ हजार कोटींचा नागरी वसाहत प्रकल्प,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ६ फेब्रुवारी –
सर्वोच्च न्यायालयाने सहारा समुहाला आज सोमवारी जोरदार दणका दिला. सुब्रतो रॉय यांच्या सहारा समूहाकडून १४ हजार ७७९ कोटींचे थकित कर्ज वसूल करण्यासाठी ‘ऍम्बी व्हॅली’ प्रकल्प ताब्यात घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पुणे येथून ८७ किमी अंतरावर लोणावळ्याजवळ सहारा समूहाचा ‘ऍम्बी व्हॅली’ हा नागरी वसाहतीचा प्रकल्प आहे. न्यायालयाने आज दिलेल्या आदेशानुसार, सहाराकडून जप्त करण्यात आलेल्या संपत्तीचा लिलाव करून तिचे वाटप लघु गुंतवणवूकदारांना करण्यात येणार आहे. न्या. दीपक मिश्रा यांच्या घटनापीठाने हे आदेश दिले.
‘सेबी’ आणि सहारा उद्योग समूह यांच्यात थकित कर्जावरून सध्या वाद सुरू आहे. कर्ज परतफेडीसाठी सहारा समूहाने जुलै २०१९पर्यंत मुदत मागितली होती. मात्र ही विनंती न्यायालयाने फेटाळून लावली. ज्या मालमत्तांवर सहारा समूहाने कर्ज घेतलेले नाही, अशा मालमत्तांची यादी २० फेब्रवारीपर्यंत न्यायालयाकडे सोपविण्यात यावी, असे घटनापीठाने सांगितले.
आजच्या निकालात, सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या पॅरोलमध्ये मात्र, वाढ करून सर्वोच्च न्यायालयाने सहारा समूहाला काहीसा दिलासा दिला आहे. रॉय यांच्या आईचे निधन झाले, तेव्हा त्यांना पॅरोलवर बाहेर सोडण्यात आले होते.
आता, रॉय हे संपत्तींची यादी न्यायालयात सादर करेपर्यंत न्यायालयाबाहेर राहतील. लहान गुंतवणूकदारांना खोटे बॉंड विकून, रॉय यांनी हजारो कोटी रुपये कमविल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी आता पुढील सुनावणी २७ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे.
आधी मुद्दल, नंतर व्याज!
थकित कर्जाची रक्कम जमा होईपर्यंत आता, सहाराचा ‘ऍम्बी  व्हॅली’  प्रकल्प सर्वोच्च न्यायालयाच्या ताब्यात राहणार आहे. सहाराकडून प्रारंभी मुद्दल असलेली रक्कम वसूल करुन घेण्यात येईल आणि त्यानंतर  व्याज वसूल केले जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29428

Posted by on Feb 7 2017. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (61 of 2453 articles)


-पन्नीरसेल्वम् यांचा राजीनामा मंजूर, चेन्नई, [६ फेब्रुवारी] - तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज सोमवारी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम् यांचा ...

×