Home » उ.खंड, ठळक बातम्या, राज्य » हरीश रावत हाजीर हो ऽऽऽ

हरीश रावत हाजीर हो ऽऽऽ

=स्टिंग प्रकरणी सीबीआयने बजावला समन्स=
harish rawatनवी दिल्ली, [२२ मे] – नऊ बंडखोर आमदार मतदानासाठी अपात्र ठरल्याने शक्तिपरीक्षेत उत्तीर्ण झालेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांना स्टिंग ऑपरेशनच्या चौकशीसाठी सीबीआयने २४ मे रोजी मुख्यालयात हजर होण्याचा समन्स जारी केला आहे.
सरकारला वाचविण्यासाठी हरीश रावत कॉंगे्रसच्या बंडखोर आणि काही अपक्ष आमदारांना लाखो रुपयांचे आमीष देत असताना हे स्टिंग करण्यात आले होते. या ऑपरेशनमधील सीडीची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर सीबीआयने त्यांना समन्स जारी केला असून, यामुळे हरीश रावत अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
उत्तराखंड विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर रावत सरकारने स्टिंग ऑपरेशनशी संबंधित प्रकरण मागे घेणारी अधिसूचना जारी केली होती. पण, कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर सीबीआयने ती फेटाळून लावली. हे स्टिंग ऑपरेशन मागे घेण्यासाठी सरकारकडे कुठलाच आधार नाही आणि ही अधिसूचना कायद्याच्या चौकटीतही बसत नाही, असे सीबीआयतर्फे स्पष्ट करण्यात आले. स्टिंगच्या सीडीत हरीश रावत आमदारांना पैशाचे आमीष दाखवत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याने आम्ही या प्रकरणाचा तपास पूर्ण करणार असल्याची भूमिकाही या सर्वोच्च तपास संस्थेने घेतली आहे. सीबीआयने या प्रकरणी २९ एप्रिल रोजी प्राथमिक चौकशीची नोंद केली होती.
विशेष म्हणजे, सीबीआयने रावत यांना यापूर्वी ९ मे रोजी समन्स जारी केला होता. पण, रावत यांनी मुदत मागितली होती. आता त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आला असल्याने त्यांना सीबीआयपुढे हजर होणे भाग पडणार आहे. दरम्यान, रावत यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना, स्टिंगची सीडी बनावट असल्याचा दावा केला आहे.
विधानसभेत बहुमत प्राप्त केल्यानंतर स्टिंग प्रकरणी सीबीआय चौकशी मागे घेणारी अधिसूचना जारी करीत, या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष चौकशी पथक गठित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याचे रावत यांनी सांगितले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28419

Posted by on May 22 2016. Filed under उ.खंड, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.खंड, ठळक बातम्या, राज्य (292 of 2452 articles)


=लालकृष्ण अडवाणी यांचे प्रतिपादन= हरिद्वार, [२२ मे] - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला याच आठवड्यात दोन वर्षे पूर्ण होत आहेत. देशवासीयांनी ...

×