richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » २०१६ वर्षात सरकारी कर्मचार्‍यांना पर्वणी

२०१६ वर्षात सरकारी कर्मचार्‍यांना पर्वणी

=९५ सार्वजनिक सुट्या=
calendar-engगोंदिया, [४ डिसेंबर] – २०१५ वर्षाला निरोप देऊन नवे वर्ष सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी उरला आहे. २०१५ च्या तुलनेत येणारे २०१६ हे वर्ष सरकारी कर्मचार्‍यांसाठी सुट्यांची पर्वणी घेऊन येणार आहे. सरकारी कर्मचार्‍यांना सणवार, थोर नेत्यांच्या जयंती, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन तसेच रविवार मिळून ९५ सुट्या मिळणार आहेत.
धुलिवंदन, गुडफ्रायडे, बुद्धपौर्णिमा गुरुवारी आले आहे. पुढील वर्षी बँका व सरकारी कार्यालयांचे कामकाज चार-चार दिवस ठप्प राहणार आहे. परंतु काही थोर महात्म्यांची जयंती रविवारी आल्याने सरकारी अधिकार्‍यांना तरी रविवारीही कार्यालयात काही तास का होईना जावे लागणार आहे. ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती, १ मे रोजी कामगार दिन, २ ऑक्टोबर गांधी जयंती, लक्ष्मीपूजन हे सण रविवारी आले आहेत. याशिवाय २५ डिसेंबरचा ख्रिसमसही रविवारी आला आहे. नव्या वर्षात पारंपरिक सण नेहमी येणार्‍या महिन्यांमध्ये आले आहेत. सप्टेंबरमध्ये गणेश जयंती, ऑक्टोबरमध्ये विजयादशमी, दिवाळी आली आहे. खास बाब म्हणजे या वर्षात जानेवारी, मे, जून, जुलै, नोव्हेंबर, डिसेंबर या सहा महिन्यांत लग्नाचे ७१ मुहूर्त असून, ऑगस्ट ते ऑक्टोबर म्हणजे ३ महिने लग्नाचा एकही मुहूर्त नाही. नव्या वर्षात सरकारी कर्मचार्‍यांना भरपूर सुट्या मिळणार आहेत. किमान तीन महिने सरकारी कर्मचार्‍यांना काम न करताही पगाराचा लाभ मिळणार आहे. असा योग पाच वर्षांनंतर येत असून, २०११ नंतर २०१६ मध्ये हा योग आला आहे.
यंदा अंगारकी चतुर्थी नाही
नव्या वर्षाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वर्षातून किमान दोन किंवा तीन वेळा येणारी अंगारकी चतुर्थी पुढील वर्षी एकदाही आलेली नाही. त्यामुळे १२ संकष्टी चतुर्थी व गणेश जयंती उत्सवच राहणार आहे. विशेष म्हणजे २५ वर्षांत हे पहिल्यांदाच घडत आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=25982

Posted by on 2:49 pm. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google