Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » २३.५५ टक्के वेतनवाढीची शिफारस

२३.५५ टक्के वेतनवाढीची शिफारस

  • केंद्रीय कर्मचार्‍यांची दिवाळी
  • सातव्या वेतन आयोगाचा अहवाल सादर
  • किमान वेतन १८ हजार

arun jaitley8नवी दिल्ली, [१९ नोव्हेंबर] – लाखो केंद्रीय कर्मचार्‍यांना आतुरतेने वाट असलेल्या सातव्या वेतन आयोगाने गुरुवारी आपला अहवाल केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना सादर केला असून, कर्मचार्‍यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तिवेतन मिळून एकूण २३.५५ टक्के एवढ्या घसघशीत वाढीची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.
न्या. ए. के. माथूर यांच्या नेतृत्वातील सातव्या वेतन आयोगाने सादर केलेल्या अहवालात घरभाडे आणि इतर भत्त्यांमध्ये भरीव वाढ सुचविली असल्याने केंद्रीय कर्मचार्‍यांच्या वेतनात एकूण २३.५१ टक्क्यांची वाढ होणार आहे. निवृत्तिवेतन आणि इतर बाबी पकडून ही वाढ २३.५५ टक्क्यांपर्यंत जाते. कर्मचार्‍यांचे किमान वेतन दरमहा १८ हजार आणि कमाल अडीच लाख असावे, अशीही शिफारस आयोगाने सादर केलेल्या ९०० पानी अहवालात करण्यात आली आहे. या शिफारशींमुळे सरकारच्या तिजोरीवर एकूण १.०२ लाख कोटींचा बोझा पडणार असून, त्यापैकी केंद्रीय अर्थसंकल्पात ७३,६५० कोटी आणि रेल्वे अर्थसंकल्पात २८,४५० कोटींचा वाटा असेल.
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी १ जानेवारी २०१६ पासून लागू होणे अपेक्षित आहे. वेतन आयोगात न्या. ठाकूर यांच्याशिवाय १९७८ च्या तुकडीचे निवृत्त आयएएस अधिकारी विवेक राय, अर्थतज्ज्ञ रथिन रॉय यांचा समावेश आहे. मीना अग्रवाल आयोगाच्या सचिव आहेत.
स्वायत्त संस्था, विद्यापीठे आणि सार्वजनिक उपक्रमातील कर्मचार्‍यांनाही सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा लाभ मिळणार आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अहवाल प्राप्त झाल्यानंतर बोलताना सांगितले.
कॉंग्रेसप्रणीत संपुआ सरकारने केंद्र सरकारचे सुमारे ४८ लाख कर्मचारी आणि ५५ लाख निवृत्तिवेतनधारकांच्या वेतनाचा फेरआढावा घेण्यासाठी सातव्या वेतन आयोगाचे गठन केले होते. आपल्या कर्मचार्‍यांच्या वेतनाचा फेरआढावा घेण्यासाठी केंद्र सरकार दर १० वर्षांनी आयोगाचे गठन करत असते आणि राज्यांकडूनही त्यामध्ये थोड्याफार सुधारणा करून त्या मान्य केल्या जातात. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी १ जानेवारी २००६ पासून लागू करण्यात आल्या होत्या.
घसरलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणल्यानंतर आता तिला चालना देण्यासाठी प्रयत्न होत असतानाच धोरण ठरविणारे आणि अर्थतज्ज्ञ, आयोगाच्या शिफारशीनुसार सुमारे एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तिधारकांना मिळणार्‍या या वाढीचा नेमका परिणाम जाणून घेण्यास उत्सुक आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25577

Posted by on Nov 20 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1207 of 2456 articles)


देशाला फायदा होईल असे बदल करा आयएएस अधिकार्‍यांना आवाहन नवी दिल्ली, [१९ नोव्हेंबर] - तणाव आणि संघर्षामुळे कोणताही बदल ...

×