Home » चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक » सुटसुटीत पोशाख : सलवार कमीज!

सुटसुटीत पोशाख : सलवार कमीज!

•चतुरस्त्र : मृणाल काशीकर•

व्यक्तिमत्व स्त्रीचं – भाग : ३

MRINAL DRESSING ARTICLE3हॅलो मैत्रिणींनो, मागील लेखांना खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपली अत्यंत आभारी आहे. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कॉमेंटच्या स्वरुपात नक्की पोहचवा.
आपणा सर्व सख्यांचा आवडता सलवार कमीज! अतिशय कम्फर्टेबल आणि सुटसुटीत! सर्व वयाच्या आणि सर्व प्रकारच्या शरीरयष्टीच्या स्त्रियांना शोभून दिसणारा एकमेव पोशाख प्रकार म्हणजे सलवार कमीज! मागील लेखात पाहिल्याप्रमाणे छान साडी नेसायला सर्वांनाच जमत नाही किंवा काहींना आवडत पण नाही. पण सलवार कमीजचे तसे नाही. सलवार-कमीज हा तसा मुळचा पंजाब आणि आस-पासच्या प्रदेशातल्या महिलांचा पोशाख. काहींच्या मते तो शक्-हून यांच्या काळातला तर काहींच्या मते तो मोगलकालीन. पोशाख कुठला हा आपला विषय नाही. तो आपण संशोधकांवर सोडू. एकंदर प्राचीन भारतातील पंजाब, सिंध, कंधार या भागातील महिला सलवार कमीज वापरत. गेल्या शतकात, विशेषतः ८० च्या दशकात तो संपूर्ण भारतभर पसरला. कधी तो आपला होऊन गेला ते आपल्याला कळलं पण नाही. पण आपण तो इतक्या कलात्मक आणि विविध तऱ्हेने स्वीकारला की बस… इंडियनवेअरची ओळख झालाय सलवार कमीज आता!
सलवार कमीज, जो पंजाबी ड्रेस, सलवार कुडता, सलवार सूट, पठाणी सूट, चुडीदार अशा अनेक नावांनी ओळखला जातो. तसा पाहlल तर या पोशाखाचा इतिहास खूप जुना आहे. इतका जुना इतिहास असलेला पेहेराव आता अनेकविध रूपात, फॅशनमध्ये आपल्याला आज पुरूष आणि स्त्रियांसाठी उपलब्ध आहे. गेल्या काही दशकात ऑफिस, शाळा, कॉलेज वा इतरत्रही सलवार कमीजने स्त्रियांची पसंती पटकावली आहे. यात आता इतक्या फॅशन वा पॅटर्न उपलब्ध आहेत की कधी कधी आपल्याला चक्रावून जायला होत. पटियाला, हरियाणवी, पठाणी, चुडीदार यासारखे सलवारचे प्रकार कंफर्ट बरोबरच दिसतात ही छान. त्यात इतक्या प्रकारचे फॅब्रिक वापरता येते की फॅशन बरोबरच स्वतःच्या व्यक्तिमत्वाला अजुन कसे रुबाबदार करता येईल यासाठी भरपूर वाव आहे.
ऑफिसला सलवार कमीज वापरणे हे खूप सर्रास आहे आणि ऍक्सेप्टेडपण आहे. सलवार कमीज सहसा ओढणीसह वापरला जातो. पण, नेकलाईनला डिज़ाइन, पॅचवर्क असेल आणि तुम्हाला सूट होत असेल तर बिना ओढणीपण वापरायला हरकत नाही. ज्यांना दुपट्टा वापरायचा नसेल त्या मैत्रिणी जाकेट वापरू शकतात. आज आपण पाहतो, सलवारचे नाना पॅटर्न, कुर्त्यांचे विविध पॅटर्न, दुपट्ट्याचे अनेक प्रकार आणि या सर्वांचे विविध कॉम्बिनेशन आपण करू शकतो. पण, सलवार कमीज ऑफिससाठी वापरताना, काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या, तर आपल्या पर्सनॅलिटीला जास्त शोभून दिसेल.
१. आपली उंची, आणि वजन याला शोभेसे फॅशन प्रकार व डिझाईन निवडा. अन्यथा, ते शोभून दिसेल का नाही याची काळजी राहील.
२. ऑफिसच्या वातावरणाला शोभेल असे रंग वापरा. त्याशिवाय, ऋतूनुसार पण आपण रंगसंगती वापरु शकतो. उदाहरणार्थ, उन्हाळ्यात पांढरे, फिक्या रंगाचे, पावसाळ्यात थोडे गडद, भिजले तरी कळून न येतील अशा रंगाचे, हिवाळ्यात गडद, काळे, इत्यादी.
३. ट्रान्सपरंट किंवा जाळीदार कापडाचे कुरते शक्यतो टाळा. किंवा त्याला अस्तर, स्लीप इत्यादी वापरा.
४. कुरत्याच्या गळ्याचे डिज़ाइन निवडताना काळजी घ्या. जास्त खोल गळा असेल, तर दुपट्टा घ्या. (मला एक मुलगी आठवते, की जी मुद्दाम खोल गळ्याचे कुरते विना ओढणी घालायची, आणि मग तिच्या आजूबाजूला नको-नको ते कॉमेंट्स ऐकू यायचे… त्यासाठी आपण इतरांना कसं जबाबदार धरणार?)
५. हल्ली लेगिंगज्, स्लॅक्सची फॅशन आहे. तो पण अतिशय सुटेबल प्रकार आहे. फक्त, तो वापरताना आपल्या शरीरयष्टीला सूट होतो का, हे पहा. अनेकजणींना स्लॅक्स चांगला दिसत नाही कारण त्यांची लोअर बॉडी हेवी असते. बऱ्याचदा लोअर बॉडी हेवी असली तरी काही काही जणींना चांगला दिसतो. पण स्लॅक्स आणि शॉर्ट टॉप घातला तर तुम्ही छान दिसणार नाही. किंवा अशा वेळेला शॉर्ट टॉप न घालता, लॉंग टॉप्स घालावे. म्हणजे लोअर बॉडी नीट झाकली जातो.
६. खूप जणींना मिक्स आणि मॅच करून ड्रेस घालायला आवडतं. आणि ते छान सुद्धा दिसतं. त्यासाठी कॉटन, सिंथेटिक, सिल्क, शिफॉन असे अनेक प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कॉम्बिनेशन करून तुमचा वेगळेपणा दाखवू शकता.
७. बऱ्याचदा, आपल्या सलवार माती/ धूळ लागून पायापाशी खराब होतात. वॉशिंग मशीनमध्ये नीट धुतले जात नाहीत; पावसाळ्यात चिखल-मातीचे डाग पडतात. आणि घाईमध्ये आपण ते तसेच वापरतो. असे केल्यास, अतिशय सुंदर ड्रेसची शोभा कमी होते. यामुळे आपला आपल्या बद्दलचाच निष्कळजीपणा दिसतो. त्याची थोडी काळजी घ्या.
८. ऑफिसमध्ये प्रसंगानुरूप फेस्टिवल, पार्टी वेअर, रुटीन युज असे अनेक प्रकारचे सलवार कमीज वापरता येतात.
९. हलक्या प्रतिचे कापड असेल तर किंवा रंग कच्चा असेल तर तो कपड्यावर पसरतो. रंग खराब झालेले कपडे वापरु नका. ते वाईट दिसते आणि तुमचे इंप्रेशन खराब करते.
१०. आपण खुपदा ओढणीला पिको न करताच वापरतो. ते अतिशय खराब दिसते. त्यामुळे ओढणी लवकर खराब पण होते. त्यामुळे याकडेपण लक्ष द्यायला हवेच. आजकाल विविध फॅशनचे लटकन, गोंडे, मणी, घुंगरू इत्यादी लावलेले दुपट्टे मिळतात, त्यामुळे ड्रेसला खूप उठावही येतो. पण हे गोंडे, मणी, घुंगरू आदी खुर्ची, दरवाजा, ड्रॉव्हरमध्ये अडकतात आणि खराब होतात त्यामुळे त्याची काळजी घ्यावी लागते.
तुम्ही विचाराल की फॅशन काय करायची…? तर मी म्हणेन त्यासाठी मार्केटमध्ये एक चक्कर मारली तरी पुरे. पण या छोट्या-छोट्या गोष्टीपण फॅशन इतक्याच महत्वाच्या नाहीत का? नक्कीच आहेत!
आपला फॅशन करण्याचा मूळ उद्देश व्यक्तिमत्व प्रभावी बनवणं हा असतो. त्यासाठी या बरोबरीने साजेशा, मॅचिंग अक्सेसरीज वापरल्यातर आपल्या सलवार कमीजला अजुन खुलवता येते.
मैत्रिणीनो, हे सदर आपलं आहे, आपल्यासाठी आहे… तुम्हाला पण जर काही टिप्स सुचवाव्याश्या वाटल्या ज्यामुळे आपले व्यक्तिमत्व अजुन उठावदार दिसेल तर कॉमेंट्समध्ये तुमच्या सूचना, मतं मांडा आणि नक्की शेअर करा!

ई-मेल- mrinal.propathconsultants@gmail.com
(लेखिका लीगल आणि HR कन्सल्टंट असून मॅनेजमेण्ट इन्स्टिट्यूटसमध्ये अध्यापन करतात.)

Short URL: https://vrittabharati.in/?p=20567

Posted by on Feb 17 2015. Filed under चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक (93 of 120 articles)


•चौफेर : अमर पुराणिक• आजपर्यंत प्रशासनात परिवर्तन आणण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाही. आजपयर्र्तच्या प्रत्येक सरकारला आपली सत्ता आबाधित राखण्यात रस ...

×