Home » अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » अरुंधती भट्टाचार्य आरबीआयच्या पहिल्या महिला गव्हर्नर?

अरुंधती भट्टाचार्य आरबीआयच्या पहिल्या महिला गव्हर्नर?

Chairperson of State Bank of India (SBI), Arundhati Bhattacharya attends the Finance Minister's meeting with Chief Executives of Public Sector bank and Financial Institutions in New Delhi on October 22, 2013.   The meeting is to take stock of non-performing assets, credit growth and financial performance, include reviewing ways to cut down deteriorating asset quality, credit growth in the targeted sectors.  AFP PHOTO/RAVEENDRAN.        (Photo credit should read RAVEENDRAN/AFP/Getty Images)

नवी दिल्ली, [१३ जून] – भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना दुसरा कार्यकाळ मिळेल की नाही, याबाबत तर्कवितर्क सुरू असतानाच भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांची आरबीआयच्या पहिल्या महिला गव्हर्नर म्हणून नियुक्ती होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रघुराम राजन आणि अरुंधती भट्टाचार्य यांचा कार्यकाळ येत्या सप्टेंबर महिन्यातच संपुष्टात येणार आहे. रघुराम राजन यांना दुसरा कार्यकाळ मिळेल, अशी अपेक्षा काही जण व्यक्त करत असतानाच अरुंधती भट्टाचार्य यांच्यासह मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम्, सेबीचे प्रमुख यु. के. सिन्हा हेदेखील या शर्यतीत असल्याचे समजते.
भट्टाचार्य यांनी एसबीआयच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला होता. फोर्ब्जने जाहीर केलेल्या आर्थिक क्षेत्रातील पाच शक्तिशाली महिलांच्या यादीत भट्टाचार्य यांना पाचवे स्थान देण्यात आले होते. शिवाय फोर्ब्जच्या सर्वांत शक्तिशाली १०० महिलांच्या यादीत अरुंधती भट्टाचार्य २५ व्या स्थानी आहेत.
देशातील सुमारे २०० वर्षे जुन्या बँकिंग व्यवस्थेला तंत्रज्ञानावर आधारित बँकिंग यंत्रणा बनविण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वात एसबीआयच्या नेटवर्कचा विस्तार होऊन बँकेच्या १७ हजार शाखा झाल्या. शिवाय एसबीआयची ३६ देशांमध्ये उपस्थिती आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28583

Posted by on Jun 13 2016. Filed under अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय (242 of 2477 articles)


नवी दिल्ली, [१३ जून] - एनएसजीमध्ये भारताला स्थान मिळू नये यासाठी चीनचे प्रयत्न सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाकडे मोर्चा ...

×