Home » कर्नाटक, छायादालन, ठळक बातम्या, राज्य » खातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही

खातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही

=स्टेट बँकेची भूमिका कर्नाटक कोर्टाला मान्य,
वृत्तसंस्था
बंगळुरू, ७ जून –
ज्या खातेधारकाच्या नावावर एटीएम जारी करण्यात आले, त्या एटीएमचा वापर त्याच्याशिवाय अन्य कुणीही करू शकत नाही. पती आपल्या पत्नीच्या किंवा पत्नी आपल्या पतीच्या एटीएमचा वापर करू शकत नाही, इतकेच काय, कोणताही नातेवाईक देखील घरात इतरांचा एटीएम वापरू शकत नाही, असा स्पष्ट निर्वाळा बंगळुरूतील एका न्यायालयाने दिला.
बँकेच्या नियमांनुसार पती आणि पत्नी आपल्या एटीएमचा पिन एकमेकांसोबत शेअर करू शकत नाही, अशी भूमिका एका प्रकरणात भारतीय स्टेट बँकेने न्यायालयात विशद केली आणि न्यायालयाने ती मान्य केली.
बंगळुरू येथील वंदना आणि राजेश यांच्याशी संबंधित हे प्रकरण आहे. नोव्हेंबर २०१३ मध्ये वंदना प्रसूती रजेवर होत्या. वंदना यांना बाहेर जाऊन एटीएममधून पैसे काढणे शक्य नव्हते, त्यामुळे त्यांनी पती राजेश कुमार यांना आपल्या डेबिट कार्डचा पिन दिला आणि पैसे काढण्यास सांगितले. राजेश यांनी घराजवळील स्टेट बँकेच्या एटीएम केंद्रात गेले आणि २५ हजार रुपये काढण्यासाठी पिन दाबला. मशीनमधून पैसे येण्याची ते वाट पाहू लागले, पण प्रत्यक्षात मशीनमधून पैसेच बाहेर आले नाही. त्याचवेळी त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर पैसे काढल्याचा मॅसेज गेला. हे समजताच त्यांनी कस्टमर केअरला फोन करून याबाबतची माहिती दिली. तिथून त्यांना पैसे परत मिळतील, असे सांगण्यात आले. मात्र, पैसे परत न मिळाल्याने त्यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रार दाखल केली. बँकेने दाम्पत्याला नियमावली दाखवत कार्डाचे किंवा पिनचे हस्तांतरण करता येत नाही. ते कार्ड एटीएम केंद्रात गेलेल्या व्यक्तीचे नसल्याने त्यांना पैसे परत मिळू शकणार नाही, असे बँकेने स्पष्ट केले. गर्भवती असल्याने मला एटीएम केंद्रात जाणे शक्य नसल्याचेही वंदना यांनी बँकेला सांगितले. पण बँकेने त्यांची भूमिका फेटाळली.
ऑक्टोबर २०१४ मध्ये हे प्रकरण ग्राहक न्यायालयात पोहोचले. ग्राहक न्यायालयातही वंदना यांनी गर्भवती असल्याने बँक किंवा एटीएम केंद्रात जाऊ शकत नव्हते, म्हणूनच पतीला डेबिट कार्ड दिले, असे सांगितले. पण काही उपयोग झाला नाही. त्यानंतर दाम्पत्याने एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले. सोबतच माहिती अधिकार कायद्यांतर्गत एटीएममधील रोकडसंदर्भात माहिती मिळवली, तेव्हा एटीएममध्ये २५ हजार रुपये अतिरिक्त असल्याचे दिसून आले. हे सर्व पुरावे वंदना आणि राजेश यांनी न्यायालयात सादर केले, पण बँकेने न्यायालयातही डेबिट कार्डासंदर्भात असलेल्या नियमावलीचा दाखला दिला. एटीएम कार्डाचे आणि पिनचे हस्तांतरण होत नाही, हा प्रकार नियमात बसत नाही. त्यामुळे या याचिकेला अर्थच नाही, असे बँकेने न्यायालयात सांगितले. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला. महिलेने तिच्या पतीला डेबिट कार्डऐवजी धनादेश द्यायला हवा होता, असे न्यायालयाने स्पष्ट केले व महिलेची याचिका फेटाळली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=35145

Posted by on Jun 10 2018. Filed under कर्नाटक, छायादालन, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कर्नाटक, छायादालन, ठळक बातम्या, राज्य (1 of 2477 articles)


=जम्मूत संतप्त नागरिकांची निदर्शने, वृत्तसंस्था जम्मू, ८ जून – पाकिस्तानला आता चिरडायलाच हवे आणि सुरक्षा स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी संपूर्ण जम्मू-काश्मीर ...

×