जपानमध्ये डॉ आंबेडकरांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
Friday, September 11th, 2015मुंबई, [१० सप्टेंबर] – जपानच्या कोयासन विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झाले. वाकायामाचे गव्हर्नर योशिनोबू निसाका, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, खा. रामदास आठवले, खा. अमर साबळे आणि माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
आज सकाळपासूनच कोयासन विद्यापीठाचा परिसर या कार्यक्रमासाठी गजबजून गेला होता. मुख्यमंत्र्यांसह आलेल्या सर्व पाहुण्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रीयन संस्कृतीचा परिचय म्हणून सर्व पाहुण्यांना फेटे बांधण्यात आले. जपानी नेत्यांनीही यावेळी फेटे बांधले होते. विद्यापीठातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संपूर्ण वातावरण भारावलेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धिझम् यावर एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन एमडीडीसीच्या वतीने करण्यात आले होते. यात पोवाडे, लेझिम नृत्याचा समावेश होता. येणार्या प्रत्येक पाहुण्याचे तुतारी वाजवून स्वागत करण्यात येत होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हा एक योगायोग म्हटला पाहिजे की, कोयासन आपल्या स्थापनेचे १२०० वर्ष साजरे करीत आहे आणि अवघे जग विशेषत: भारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंतीवर्ष साजरे करीत आहे. आजच्या या ऐतिहासिक क्षणाबद्दल वाकायामाचे गव्हर्नर निसाका आणि त्यांच्या चमूचे आपण अतिशय आभारी आहोत. त्यांचा निश्चयी पाठिंबा नसता, तर आज येथे हा पुतळा उभारता आला नसता. येथील मंदिर व्यवस्थापन आणि कोयासन विद्यापीठाचाही मी अतिशय ऋणी आहे. त्यांनी हा पुतळा येथे उभारण्याची परवानगी दिली. हा पुतळा ही महाराष्ट्र आणि भारताच्या जनतेकडून, कोयासन आणि जपानच्या नागरिकांना एक अमूल्य भेट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक प्रख्यात विधिज्ञ, नेते आणि समाजसुधारक होते. जगातील आघाडीच्या बुद्धिस्ट नेत्यांपैकी ते एक. बुद्ध धम्माचे तत्त्व आणि शिकवण ते आयुष्यभर जगले आणि त्यातून अनेकांचे आयुष्यही त्यांनी समृद्ध केले.
याच कार्यक्रमाला जोडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कोयासन विद्यापीठ यांच्यात एका सामंजस्य करारावरही स्वाक्षरी करण्यात आली. या दोन्ही विद्यापीठांचे कुलगुरू यावेळी उपस्थित होते. या दोन्ही विद्यापीठांमध्ये संबंध अधिक वृद्धिंगत करण्यावर या करारातून भर देण्यात आला आहे. त्यापूर्वी काही बुद्धस्थळांना मुख्यमंत्र्यांनी भेटी दिल्या आणि बौद्ध भिक्खूंसोबत प्रार्थनाही केली.
Short URL: https://vrittabharati.in/?p=23755

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!