Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » दिवंगत सदस्यांना संसदेची श्रद्धांजली

दिवंगत सदस्यांना संसदेची श्रद्धांजली

parliament porchनवी दिल्ली, [२३ फेब्रुवारी] – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात दिवंगत सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
लोकसभेत अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सौदी अरबचे राजे अब्दुल्ला बिन अब्दुल अजिज अल सऊद तसेच लोकसभेतील दिवंगत सदस्य जी. वेंकटस्वामी, मेजर रंजितसिंह, डॉ. सरोजिनी महिषी आणि डॉ. रामानायडू दग्गुबानी यांना श्रद्धांंजली मांडणारा प्रस्ताव मांडला तसेच या सदस्यांच्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. नंतर सभागृहाने दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.
राज्यसभेत सौदी अरबचे राजे अब्दुल्ला बिन अब्दुल अजिज अल सऊद तसेच दिवंगत सदस्य एस. के. टी. रामचंद्रन, श्रीमती कमला सिन्हा, रामेश्‍वर ठाकूर, अनंतराम जयस्वाल, डॉ. सरोजिनी महिषी, आर. के. लक्ष्मण आणि श्रीमती मनोरमा डी. शर्मा यांना श्रद्धांजली वाहणारा प्रस्ताव सभापती हमीद अन्सारी यांनी वाचून दाखवला. त्यांतर सभागृहाने दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20864

Posted by on Feb 24 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (2021 of 2477 articles)


नवी दिल्ली, [२३ फेब्रुवारी] - राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची पुन्हा नियुक्ती झाली आहे. जम्मू ...

×