Home » उ.महाराष्ट्र, छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरूवात

ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरूवात

nashik kumbhmela startaनाशिक, [१४ जुलै] – नाशिकमध्ये १२ वर्षांनी कुंभमेळ्याच्या पावन पर्वाला सुरूवात झाली आहे. आज मंगळवार पहाटे ६ वाजून १६ मिनिटांच्या मुहूर्तावर नाशिकच्या गोदाकाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर त्र्यंबकेश्‍वर येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सुरूवात झाली. त्र्यंबकेश्‍वर येथे झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यावेळी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टीही करण्यात आली.
नाशिकमध्ये रामकुंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाशिक जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश महाजन तर त्र्यंबकेश्‍वरमध्ये कुशावर्तावर कें द्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आलं. यावेळी सर्व आखाड्‌यांच्या साधू महंतांसह भाविकांची मोठ्‌या प्रमाणावर गर्दी होती. दर १२ वर्षांनी होणार्‍या या कुंभ मेळ्यासाठी नाशिकमध्ये स्नानासाठी भाविक दुरूनदुरून येतात.
त्र्यंबकेश्‍वर येथे झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यावेळी हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टीही करण्यात आली. या सोहळ्यासाठी ५० किलो वजनाची पंचधातूची ध्वजपताका तयार करण्यात आली. या पताकेवर गुरू, सूर्य, चंद्र, गोदावरी व वाहन मगर, दशदिशा, बारा राशी यांसह ओम र्‌हीम, स्वस्तिक अशी चिन्हे आहेत. कुशावर्त तीर्थावर ३१ फुट उंचीच्या खांबावर ही पताका बसविण्यात आली.
ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपताच लाखो भाविकांनी गोदावरीमध्ये स्नान केले. अनेक भाविक आज दिवसभर नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वरमध्ये गर्दी करणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्‌विटरवरून भाविकांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23438

Posted by on Jul 15 2015. Filed under उ.महाराष्ट्र, छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.महाराष्ट्र, छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र (1557 of 2476 articles)


=शोक प्रस्तावावेळी वाद उपस्थित करणे चुकीचे : मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले= मुंबई, [१३ जुलै] - राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सोमवारी ...

×