Home » छायादालन, ठळक बातम्या, बंगाल, राजकीय, राज्य, राष्ट्रीय » नेताजींचे पणतू चंद्रकुमार बोस भाजपात

नेताजींचे पणतू चंद्रकुमार बोस भाजपात

Chandra Kumar Bose joined bjp, with Amit Shahकोलकाता, [२५ जानेवारी] – पश्‍चिम बंगाल विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना, नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी आज सोमवारी भाजपात प्रवेश केला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शाह यांची रविवारी फेरनिवड झाल्यानंतर आज त्यांची हावडा येथे पहिलीच भव्य जाहीर सभा झाली. भाजपाच्या निवडणूक प्रचाराचा हा शुभारंभ असल्याचे म्हटले जात आहे. या जाहीर सभेत चंद्रा बोस यांनी भाजपात प्रवेश केला. बोस यांच्या प्रवेशामुळे भाजपाला आणखी बळकटी मिळेल, असा विश्‍वास अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केला. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच नेताजींशी संबंधित १०० गोपनीय फाईल्स सार्वजनिक केल्या होत्या. त्यावर बोस यांच्या परिवारातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सूत्रांच्या मते, चंद्रा बोस यांच्याकडे निवडणूक प्रचाराची मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. किंबहुना, तेच भाजपाचे राज्यातील मुख्य प्रचारक राहण्याची शक्यता आहे.
पश्‍चिम बंगालमध्ये सत्तेवर येण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने अमित शाह यांनी आज येथे सभा घेतली. यावेळी सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी सत्तारूढ तृणमूल कॉंगे्रसवर जोरदार टीका केली. या सरकारच्या काळात पश्‍चिम बंगाल राष्ट्रविरोधी शक्तीचे केंद्र बनले आहे. असंख्य असामाजिक तत्वांना येथे आश्रय दिला जात आहे, असा आरोप करताना, राज्यातील उद्योगही बंद होण्याच्या मार्गावर असून, येथे केवळ चिट फंडचा व्यवसायच तेजीत सुरू आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26637

Posted by on Jan 27 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, बंगाल, राजकीय, राज्य, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, बंगाल, राजकीय, राज्य, राष्ट्रीय (876 of 2478 articles)


=‘त्या’ घटनेचे दु:ख अजूनही वाटते: मुलायमसिंह यांची कबुली= लखनौ, [२५ जानेवारी] - अयोध्येतील बाबरी मशिद विध्वंसाच्या काळात कारसेवकांवर गोळीबाराचा आदेश ...

×