Home » आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप » नेताजींच्या पणतूने घेतली नरेंद्र मोदींची भेट

नेताजींच्या पणतूने घेतली नरेंद्र मोदींची भेट

=गोपनीय फाईल्स सार्वजनिक करण्याची मागणी=
suryakumar bose-narendra modiबर्लिन, [१४ एप्रिल] – आझाद हिंद सेनेचे संस्थापक आणि थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू सूर्यकुमार बोस यांनी सोमवारी रात्री येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि नेताजींच्या रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याप्रकरणाच्या गोपनीय फाईल्स सार्वजनिक करण्याची मागणी केली.
भारताचे जर्मनीतील राजदूत विजय गोखले यांनी सोमवारी रात्री पंतप्रधानांच्या सन्मानार्थ स्वागत सोहळा आयोजित केला होता. यात सूर्यकुमार बोस यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. या समारंभात बोस यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. सूर्यकुमार बोस हे भारत-जर्मन संघटनेचे अध्यक्ष आहेत.
मोदी यांची भेट घेतल्यानंतर सूर्यकुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारने नेताजींच्या कुटुंबीयांवर तब्बल १६ वर्षे पाळत ठेवली होती, या अलीकडील गौप्यस्फोटाचा आपल्याला धक्का बसला आहे. नेताजींच्या बेपत्ता होण्याशी संबंधित ज्या वर्गीकृत फाईल्स आहेत, त्या शक्य तितक्या लवकर सार्वजनिक करण्यात याव्या, अशी विनंती आपण पंतप्रधानांना केली आहे. मोदी सरकारवर आपला पूर्ण विश्‍वास आहे आणि नेताजींच्या मृत्यूशी संबंधित सत्य लवकरच समोर येईल, अशी खात्री आहे. हे सत्य बाहेर आणण्यासाठी मोदी सरकारने चौकशी आयोग गठित करावा, अशी आपली मागणी आहे.
मोदी यांच्यासोबत आपली अतिशय सकारात्मक चर्चा झाली. नेताजींबाबतचे सत्य बाहेर आणण्यासाठी आपले सरकार आवश्यक ती पावले उचलेल, अशी हमी मोदी यांनी दिली आहे. गोपनीय कागदपत्रे उघड केल्यास इतर देशांसोबत असलेले भारताचे संबंध बिघडतील, हे कारण मान्य न होणारे आहे, असेही बोस यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22087

Posted by on Apr 15 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप (1802 of 2483 articles)


पुणे, [१४ एप्रिल] - अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने आयोजित केलेले २२ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य समेलन २३ ...

×