Home » छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » भारत-आफ्रिका परिषद आजपासून

भारत-आफ्रिका परिषद आजपासून

  • हवाई निगराणीसाठी दोन हेलिकॉप्टर्स तैनात
  • हा ऐतिहासिक क्षणच : पंतप्रधान

india_africa_summitनवी दिल्ली, [२५ ऑक्टोबर] – भारत आणि आफ्रिका परिषद उद्या सोमवारपासून सुरू होत आहे. चार दिवस चालणार्‍या या परिषदेच्या काळात कुठलाही धोका उद्‌भवणार नाही, याची काळजी घेण्यासाठी दोन हेलिकॉप्टर्स हवाई निगराणीसाठी चोवीसही तास तैनात राहणार आहेत.
२६ ते २९ ऑक्टोबर या काळात ही परिषद होणार आहे. ५४ आफ्रिकन देश आणि संघटनांना या परिषदेत निमंत्रित करण्यात आले आहे. आफ्रिकेबाहेर इतक्या भव्य स्वरूपात प्रथमच अशा प्रकारची परिषद आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमातून, भारतात प्रथमच इतकी भव्य परिषद आयोजित करण्यात आली असल्याचे नमूद केले आहे. भारत आणि आफ्रिकन देशांकरिता ही परिषद ऐतिहासिक महत्त्वाची अशीच आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
या परिषदेवर कोणतेही संकट यायला नको, यासाठी दोन हेलिकॉप्टर्स तैनात राहतील. यातील एक हेलिकॉप्टर सातत्याने निगराणी करेल आणि दुसरे आकस्मिक संकटाचा सामना करेल. याशिवाय, इंदिरा गांधी स्टेडियमवर होणार्‍या मुख्य परिषदेवर आणि अतिमहत्त्वपूर्ण व्यक्तींच्या सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी वेगळे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून, मुख्य ठिकाणी २०० तसेच इतरत्र ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, अशी माहिती दिल्लीचे पोलिस सहआयुक्त टी. एस. लुथरा यांनी दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25325

Posted by on Oct 26 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1283 of 2477 articles)


=सातमध्ये दोन भारतीय नावांचा समावेश= नागपूर, [२५ ऑक्टोबर] - नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने शोध लावलेल्या दोन तार्‍यांचे नामकरण ...

×