भारत-जर्मनी संबंध नव्या उंचीवर
Tuesday, October 6th, 2015- ऍन्जेला मार्केल, नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा
- सामंजस्याच्या १८ करारांवर स्वाक्षरी
नवी दिल्ली, [५ ऑक्टोबर] – भारत आणि जर्मनीमधील द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चान्सलर ऍन्जेला मार्केल यांनी आज सोमवारी व्यक्त केला. या दोन्ही नेत्यांमध्ये संरक्षण उत्पादन, व्यापार, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि स्वच्छ ऊर्जा यासारख्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर व्यापक चर्चा झाल्यानंतर, सामंजस्याच्या १८ करारांवर स्वाक्षर्या करण्यात आल्या.
जर्मनीच्या चान्सलर मार्केल यांचे आज सोमवारी सकाळी भारताच्या तीन दिवसीय भेटीवर राजधानी दिल्लीत आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नमस्ते’ म्हणत स्वागत केले. त्यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील काही सदस्य, वरिष्ठ अधिकारी आणि जर्मन कंपन्यांमधील मुख्य कार्यकारी अधिकार्यांचे शिष्टमंडळही भारतात आले आहे.
राष्ट्रपती भवनात मार्केल यांचे संपूर्ण लष्करी इतमामात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना मानवंदनाही देण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळातील अन्य वरिष्ठ सदस्य यावेळी उपस्थित होते. यानंतर मार्केल आणि नरेंद्र मोदी यांच्यात हैदराबाद हाऊसमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली.
आमच्यात अतिशय पोषक वातावरणात चर्चा झाली. संरक्षण क्षेत्रात दोन्ही देशांमधील संबंध नव्या उंचीवर नेण्यास आमच्यात एकमत झाले. भारताच्या आर्थिक विकासात जर्मनी हा नैसर्गिक भागीदार राहिला आहे. जर्मनीची शक्ती आणि भारताची दूरदृष्टी नेहमीच उभयतांना फायद्याची ठरली आहे. आर्थिक संबंध आणखी बळकट करण्यावर आम्ही भर दिला आहे. शांत आणि स्थिर जगाच्या निर्मितीत भविष्यात दोन्ही देशांचे योगदान फार मोठे राहणार आहे, असे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भारत आता अतिशय वेगाने आर्थिक क्षेत्रात प्रगती करीत आहे. मोदी यांच्या प्रयत्नांना आमचा नेहमीच पाठिंबा राहणार आहे. भारताचा विकास करण्याची जिद्द आम्ही मोदी यांच्यात पाहिली आहे. यात भागीदार होण्यासाठी जर्मनी अतिशय इच्छूक आहे. विकासाची दृष्टी असलेला पंतप्रधान लाभणे हे भारतीयांचे फार मोठे भाग्यच आहे, असे ऍन्जेला मार्केल यांनी सांगितले.
दूर्गा देवीची मूर्ती भारताला सोपवली
दरम्यान, दोन दशकांपूर्वी काश्मिरातील मंदिरातून चोरीला गेलेली आणि नंतर जर्मनीत सापडलेली १० व्या शतकातील दुर्गा देवीची मूर्ती मार्केल यांनी आज भारताच्या स्वाधीन केली. मार्केल यांनी ही मूर्ती पंतप्रधान मोदी यांना सोपवली. यावेळी मोदी यांनी त्यांचे आभार मानले.
अभ्यासक फौजिया सईद
Short URL: https://vrittabharati.in/?p=24176

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!