Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » समुद्र सहकार्य, शांततेचे प्रतीकच : राष्ट्रपती

समुद्र सहकार्य, शांततेचे प्रतीकच : राष्ट्रपती

  • प्रणव मुखर्जींनी केले अवलोकन
  • युद्धनौका संचलन थाटात
  • पंतप्रधानांचीही विशेष उपस्थिती

pranab mukharjee, narendra modi, manohar parrikar at ins sumitraविशाखापट्टणम्, [६ फेब्रुवारी] – राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी त्यांच्याकरिता खास उभारलेल्या प्रेसिडेन्शिअल यॉट, आयएनएस सुमित्रामधून आंतरराष्ट्रीय युद्धनौका संचलन समारोहात सहभागी युद्धनौकांची आणि आरमार शक्तीची पाहणी केली. बंगालच्या उपसागरात आयोजित या भव्य सोहळ्यादरम्यान भारतीय नौदलाचे सर्वोच्च कमांडर असलेले राष्ट्रपती मुखर्जी यांना यावेळी मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर हे विशेषत्वाने उपस्थित होते.
या सोहळ्यात सहभागी अन्य सर्व देशांचा उत्साह पाहून राष्ट्रपतींनी यावेळी म्हटले की, एकाच वेळी एकाच महासागरात झालेला हा सोहळा म्हणजे आपल्या सर्वांकरिता समुद्र हा मैत्री, शांतता आणि सहकार्याचे प्रतीकच असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळेच जगाच्या दृष्टीने सागरी सहकार्याची भागीदारीही यानिमित्ताने झळकली आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, हेलिकॉप्टर्स आणि युद्धनौका, पाणबुड्या व लहान आकाराच्या जहाजांनी पूर्वनियोजित पद्धतीने आपापल्या शक्तींचे प्रदर्शन करून उपस्थितांसमोर नेत्रदीपक कामगिरी बजावली. अशाप्रकारचा हा ११ वा युद्धनौका संचलन सोहळा असून भारताने यंदा दुसर्‍यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या भव्यदिव्य कार्यक्रमामुळे भारताच्या नौदलाचे सामर्थ्य संपूर्ण जगाने पाहिले व अनुभवले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26754

Posted by on Feb 7 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (852 of 2477 articles)


संयुक्त राष्ट्र, [६ फेब्रुवारी] - जगभरात तब्बल २० कोटी महिला व मुली अशा आहेत ज्यांचा सुंता करण्यात आला आहे. यांपैकी ...

×