Home » क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या, फिचर » ३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम

३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम

dolly tirandaj 3yearsहैदराबाद, [२५ मार्च] – तीन वर्षीय डॉली शिवानी चेरुकरी हिने तिरंदाजीमध्ये राष्ट्रीय विक्रम करीत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये आपले नाव नोंदविले आहे. ज्या वयात मुले चालायला शिकतात त्या वयात डॉलीने केलेल्या कामगिरीमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
डॉलीचा भाऊ आंतरराष्ट्रीय स्तराचा तिरंदाज होता व तो प्रशिक्षकाचीही भूमिका पार पाडत होता. २०१० साली त्याचा एका रस्ता अपघातात मृत्यू झाला. डॉलीचा जन्म सरोगसीमधून झाला आहे. २००४ साली डॉलीच्या मोठ्या बहिणीचाही मृत्यू झाला होता. अशा संकटांचा सामना करणार्‍या डॉलीच्या कुुटुंबीयांना तिच्या अभूतपूर्व कामगिरीमुळे जगण्यास नवसंजीवनी मिळाली आहे. डॉलीच्या या विक्रमाची मंगळवारी तिच्या जन्मदिनी अधिकृत नोंद करण्यात आली.
नऊ दिवसांपूर्वी डॉली २०० गुणांची नोंद करणारी भारतातील सर्वात कमी वयाची खेळाडू ठरली होती. आंध्र प्रदेश राज्य तिरंदाजी स्पर्धेत सहभागी होताना डॉलीने ३८८ गुण प्राप्त केले होते. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌च्या विश्‍वरूप रॉय चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉलीने पाच आणि सात मीटर अंतरावरून तिरंदाजी करीत २०० गुण नोंदविले होते. ही कामगिरी करणारी ती भारतातील सर्वात कमी वयाची खेळाडू ठरली. हा जबरदस्त विक्रम भविष्यात तोडला जाण्याची शक्यता खूपच कमी आहे.
जेव्हा ती अतिशय लहान होती तेव्हापासूनच तिने तिरंदाजीचा सराव सुरू केला. त्यामुळे तिला सराव करताना बाण सहज उचलता यावे म्हणून ते कार्बनपासून तयार करण्यात आले होते. ‘आमच्या घरी नवीन पाहुणा येणार आहे, असे जेव्हा आम्हाला कळले तेव्हाच आम्ही तिला तिरंदाज करायचे ठरविले’, असे डॉलीचे वडील चेरुकुरी सत्यनारायण यांनी सांगितले. चेरुकुरी हे तिरंदाजीची अकादमी चालवितात, हे येथे उल्लेखनीय.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21718

Posted by on Mar 26 2015. Filed under क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या, फिचर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या, फिचर (1858 of 2480 articles)


नवी दिल्ली, [२३ मार्च] - प्रख्यात चित्रपट निर्माते आणि अभिनेते शशी कपूर यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके ...

×