Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » अकबर ‘ग्रेट’, महाराणा प्रताप नाही का?

अकबर ‘ग्रेट’, महाराणा प्रताप नाही का?

=गृहमंत्री राजनाथसिंह यांचा सवाल, नव्याने इतिहास लिहिण्याचे आवाहन=
rajnathsingh2प्रतापगड, [१८ मे] – मुघल सम्राट अकबर यांच्यापुढे कायम ‘ग्रेट’ ही उपाधी लावण्यात येते. मग, मेवाडचे महाराज महाराणा प्रताप हे ‘गे्रट’ अर्थात महान नव्हते का, असा रोखठोक सवाल उपस्थित करून, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी इतिहासकारांना इतिहासाची नव्याने रचना करण्याचे आवाहन केले आहे.
सम्राट अकबर यांच्यापुढे ‘द ग्रेट’ ही उपाधी लावतात. पण, महाराणा प्रताप यांच्या नावापुढे ‘द ग्रेट’ ही उपाधी का लावली जाऊ शकत नाही. मेवाड राज्यात महाराणा प्रताप यांनी केलेले कार्य आणि दिलेले बलिदान कदापि दुर्लक्षित करता येणार नाही. त्यांचे कार्य अतिशय महान असल्याने त्यांनाही तितकाच सन्मान देण्यात यावा, असे राजनाथसिंह यांनी राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रविवारी सायंकाळी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना सांगितले.
या समारंभात बोलताना राजनाथसिंह म्हणाले की, माझ्या नजरेत महाराणा प्रताप हेदेखील अतिशय महान असल्याने त्यांना आवश्यक तो सन्मान प्राप्त करून देण्यासाठी इतिहासकारांनी इतिहासात आवश्यक ते बदल करायलाच हवे. सीबीएसईच्या अभ्यासक्रमात महाराणा प्रताप यांच्यावरील पाठ्यक्रमाचा समावेश करण्यात यावा, अशी विनंती आपण स्वत: केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे करणार आहोत, असेही ते म्हणाले.
महाराणा प्रताप यांच्याविषयी चर्चा सुरू झाल्यानंतर मेवाडची आठवण होते. महाराणा प्रताप यांची यशोगाथा भारतासह जगभरात पोहोचविण्याचे कार्य केंद्र सरकार करणार आहे. महाराणा प्रताप यांची ४७५ वी जयंती देशभरात साजरी करण्यात येणार आहे. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी महाराणा प्रताप यांनी आपले सर्वस्व गमावले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22613

Posted by on May 19 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1679 of 2453 articles)


=केंद्रीय ऊर्जामंत्री गोयल यांची ग्वाही= नवी दिल्ली, [१८ मे] - आगामी पाच वर्षात देशातील प्रत्येक घरात चोवीस तास वीज उपलब्ध ...

×