Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य, राष्ट्रीय » अटलबिहारी वाजपेयी यांच्या बहिणीचे निधन

अटलबिहारी वाजपेयी यांच्या बहिणीचे निधन

kamla-dixit-atalji sisterआग्रा, [२७ नोव्हेंबर] – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची लहान बहिण कमला दीक्षित यांचे गुरुवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास आग्रा येथे निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८७ वर्षें होते.
अटलबिहारी वाजपेयी यांची कमला दीक्षित या लहान बहिण आहेत. एकूण सात भावडांमध्ये अटलबिहारी यांचा चौथ्या तर कमला यांचा पाचवा क्रमांक आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांना उच्च रक्तदाबामुळे अर्धांगवायुचा झटका आला होता आणि त्यांचे बोलणे चालणेही बंद झाले होते. जवळपास पाच महिने अंथरुणाला खिळून राहिल्यानंतर, गुरूवारी रात्री त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25777

Posted by on Nov 28 2015. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य, राष्ट्रीय (1138 of 2454 articles)


=मल्लिकार्जुन खरगेंचे चिथावणीखोर वक्तव्य= नवी दिल्ली, [२६ नोव्हेंबर] - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने राज्य घटना बदलण्याचा प्रयत्न केला, तर देशात ...

×