Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » अमेरिकेच्या धार्मिक आयोगाला व्हिसा नाकारला

अमेरिकेच्या धार्मिक आयोगाला व्हिसा नाकारला

Visa Application Denied Stamp Showing Entry Admission Refused

Visa Application Denied Stamp Showing Entry Admission Refused

वॉशिंग्टन, [४ मार्च] – भारतातील धार्मिक स्वातंत्र्याबाबतच्या कथित अडचणींबाबत चर्चा करून आढावा घेण्यासाठी इच्छुक असलेल्या अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्य आयोगाच्या सदस्यांना भारताने व्हिसा नाकारला आहे.
व्हिसा नाकारण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाने आम्ही खूप निराश आहोत, असे अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाचे अध्यक्ष रॉबर्ट पी. जॉर्ज यांनी सांगितले. या आयोगाचे तीन सदस्यीय शिष्टमंडळ आज शुक्रवारपासून आठवडाभराच्या भारत दौर्‍यावर येण्यास उत्सुक होते. या दौर्‍यात भारतातील सरकारी अधिकारी, धार्मिक नेते व कार्यकर्त्यांना भेटण्याची त्यांची योजना होती.
अमेरिकेचा एक घनिष्ठ सहकारी आणि बहुलवादी, गैरसांप्रदायिक आणि लोकशाही असलेल्या भारताला आमच्या दौर्‍याबाबत आत्मविश्‍वास असायला हवा, असेही ते म्हणाले. २०१४ पासून भारतातील धार्मित स्वातंत्र्य धोक्यात आले आहे, अशा आशयाच्या धार्मिक समुदाय, सिव्हिल सोसायटी गट व स्वयंसेवी संस्थांकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या पार्श्‍वभूमीवर आम्ही दौर्‍यासाठी आग्रही राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्य आयोगाच्या सदस्यांना भारताने व्हिसा नाकारण्याची ही पहिली वेळ नसून, यापूर्वी कॉंग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या पहिल्या कार्यकाळातही व्हिसा नाकारण्यात आला होता. हा आयोग जगभरातील देशांमधील धार्मिक स्वातंत्र्याबाबत वार्षिक अहवाल तयार करत असतो.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27025

Posted by on Mar 5 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (766 of 2453 articles)


पुद्दुचेरी, तामिळनाडूत १६ मे रोजी मतदान आसामात दोन, तर बंगालमध्ये ६ टप्प्यांत मतदान १९ मेला लागणार निकाल नवी दिल्ली, ...

×