Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » अयोध्येत येणार्‍या भाविकांना सर्व सुविधा द्या

अयोध्येत येणार्‍या भाविकांना सर्व सुविधा द्या

=सुप्रीम कोर्टाचे केंद्र, राज्याला निर्देश=
supreme_court_1नवी दिल्ली, [८ ऑगस्ट] – अयोध्येतील रामजन्मभूमी परिसरात येणार्‍या सर्व भाविकांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकारला दिले आहेत.
रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद न्यायप्रविष्ट असला, तरी भगवान श्रीरामाचे दर्शन घेण्याकरिता येथे दररोज असंख्य भाविक येत असतात. त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यावर गांभीर्याने विचार व्हायलाच हवा. केंद्र व राज्य सरकारने त्यांना शक्य होईल त्या सुविधा द्यायला हव्या, असे न्या. ए. आर. दवे आणि न्या. कुरियन जोसेफ यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने स्पष्ट केले.
भाजपा नेते आणि प्रख्यात कायदेतज्ज्ञ सुब्रमण्यम् स्वामी यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारला आपले उत्तर सादर करण्याचेही निर्देश दिले आहेत. स्वामी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, प्रभू श्रीरामाचे भक्त येथे मोठ्या संख्येत येत असतात. पण, त्यांना पिण्याचे पाणी, शौचालय यासारख्या मूलभूत सुविधांपासूनच वंचित ठेवले जाते. केंद्र आणि राज्य सरकारने या परिसरात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केल्या नसल्याने भाविकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
न्यायालयाच्या आदेशानंतर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मनिंदरसिंग म्हणाले की, स्वामी यांनी याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्यांवर केंद्र सरकार निश्‍चितच गंभीरपणे विचार करेल.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23593

Posted by on Aug 9 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1529 of 2453 articles)


=भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे आवाहन= मुंबई, [७ ऑगस्ट] - ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला चांगले यश मिळाले आहे. विरोधकांच्या ...

×