Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आरक्षणाला राजकीय व्यवस्था जबाबदार

आरक्षणाला राजकीय व्यवस्था जबाबदार

=लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांचे मत=
sumitra-mahajan1अहमदाबाद, [२५ जानेवारी] – देशातील मागास वर्गासाठी लागू करण्यात आलेल्या आरक्षणाला ६५ वर्षे पूर्ण झाली, तरी दलित आणि मागासवर्गियांच्या परिस्थितीमध्ये अजूनही बदल झालेला नाही, असे मत लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले आहे.
राज्यघटनेची निर्मिती करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गियांसाठी दहा वर्षांसाठी आरक्षण लागू केले होते. या आरक्षणामुळे मागासवर्गीय पुढारलेल्या समाजाबरोबर येऊ शकतो, असे त्यांना वाटत होते. मात्र सध्या आरक्षणाला राजकीय व्यवस्था जबाबदार असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. संसदेमध्ये ज्यावेळी आरक्षणाचा कालावधी वाढविण्याचा प्रस्ताव मांडण्यात येतो, त्यावेळी सर्व पक्षांचे नेते याचे समर्थन करतात, असे त्यांनी म्हटले आहे.
विधानसभा अधिवेशनासाठी कालावधी निश्‍चित
आता राज्य सरकारे विधानसभा अधिवेशनासाठी आपली मनमानी करू शकणार नाहीत. सुमित्रा महाजन यांच्या उपस्थितीत देशातील विधानसभा अध्यक्ष आणि सचिव यांच्या संमेलनामध्ये अधिवेशनाच्या कालावधीबाबत प्रस्ताव संमत करण्यात आला.
गांधीनगर येथे गुजरात विधानसभा अधिकार्‍यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना लहान विधानसभेसाठी तीस दिवसांचा, तर मोठ्या विधानसभेसाठी ६० दिवसांचा कालावधी निश्‍चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
भारतासारख्या लोकशाही देशामध्ये चर्चा आणि संवाद अत्यावश्यक आहे. लोकसभा तसेच विधानसभेत सभासदांमध्ये मतदारांच्या प्रश्‍नांबाबत चर्चा करण्यात आली तरच समस्यांचे समाधान निकाली निघू शकते, असे त्या म्हणाल्या.
सभागृहामध्ये सर्व सदस्यांना समान संधी देण्यात आली पाहिजे. मात्र, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागास वर्गाच्या सदस्यांना विशेष वेळ देण्यात आला पाहिजे. कारण या वेळेत ते आपल्या वर्गाच्या समस्या मांडू शकतात. तसेच लोकशाहीमध्ये महिलांनाही अधिक प्रमाणामध्ये संधी देण्यात याव्यात, असे राज्यपाल ओ. पी. कोहली यावेळी म्हणालेे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26628

Posted by on Jan 27 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (878 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२१ जानेवारी] - केंद्र सरकारच्या ‘अतुल्य भारत’ अभियानासाठी महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची ब्रॅण्ड ऍम्बेसिडर ...

×