Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » इंटरनेटवरील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी

इंटरनेटवरील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी

  • टाईम मॅगझिनचा अहवाल
  • बराक ओबामांचाही समावेश

narendra-modi-न्यूयॉर्क, [७ मार्च] – टाईम मॅगझिनने नुकतीच इंटरनेटवर सर्वात प्रभावशाली अशा ३० व्यक्तीची यादी प्रकाशित केली आहे. यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचाही प्रामुख्याने समावेश आहे.
सोशल मीडियाचा सातत्याने पाठपुरावा करणार्‍या, नेहमीच सर्चमध्ये असणार्‍या आणि मोठ्या बातम्यांचा विषय ठरणार्‍या लोकांचा ही यादी तयार करताना अभ्यास करण्यात आला. हॅरी पॉटर मालिकेचे ब्रिटिश लेखक जे. के. रॉलिंग आणि गायक टेलर स्विफ्ट व बेयॉन्स यांनाही यादीत स्थान मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर व फेसबुक यासारख्या सोशल नेटवर्किंग साईट्‌सवर सुमारे ३८ दशलक्ष म्हणजेच ३ कोटी ८० लाख चाहते आहेत. लोकप्रियतेत बराक ओबामा वगळता जगभरातील नेत्यांच्या तुलनेत मोदी यात बरेच पुढे आहेत.
भारतातील आजवरच्या ज्या पंतप्रधानांना शक्य झाले नाही, तेदेखील मोदी यांनी शक्य करून दाखविले आहे. ते म्हणजे, ऑनलाईनवर नेहमीच राहणार्‍या २० कोटी लोकसंख्येपर्यंत थेट पोहोचणे! सोशल नेटवर्किंग साईट्‌सचा कशाप्रकारे प्रभावी वापर केला जाऊ शकतो, हे मोदी यांनी दाखवून दिले आहे. ओबामा आणि मोदी हे दोघेही सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करणारे नेते असल्याने त्यांच्यातील जवळीक आणखी वाढली आहे, असे टाईमने म्हटले आहे.
ओबामा यांच्याबाबत टाईमने असे नमूद केले आहे की, बराक ओबामा हे फेसबुकवरील जगातील सर्वात प्रभावशाली आणि लोकप्रिय नेते आहेत. ट्विटरवरही त्यांचे असंख्य चाहते आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21172

Posted by on Mar 8 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1965 of 2458 articles)


=कासमी यांचे मत= बिजनौर, [७ मार्च] - आम आदमी पार्टीतील अंतर्गत कलहामुळे स्वच्छ आणि पारदर्शी राजकारणाची अपेक्षा असलेल्या सर्वसामान्य लोकांचा ...

×