Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » इंदिरा गांधी सत्तालोलुप होत्या

इंदिरा गांधी सत्तालोलुप होत्या

  • काटजूंचे आणखी एक वादग्रस्त विधान
  • केंद्र सरकारचा ‘तो’ निर्णय योग्यच

markendeya katjuनवी दिल्ली, [१७ सप्टेंबर] – माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी सत्तालोलुप महिला होत्या. त्या कोणत्याही पातळीपर्यंत जाऊ शकत होत्या, अशी तीव्र टीका सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.
इंदिरा गांधी आणि माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची डाक तिकिटे बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णयही न्या. काटजू यांनी योग्य ठरविला आहे. काटजू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘मी भाजपा सरकारचा प्रशंसक नाही. मात्र, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यावरील डाक तिकिटे बंद करण्याचा सरकारचा निर्णय योग्यच आहे. या निर्णयात मला काहीही चुकीचे वाटत नाही.’
आपल्या ब्लॉगवर न्या. काटजू पुढे लिहितात, इंदिरा गांधी यांना कुठल्याही तत्त्वांशी देणेघेणे नव्हते. त्या सत्तालोभी होत्या. १९७५ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा ठपका ठेवल्यानंतर इंदिरा गांधी यांनी सत्तेवरील आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी सर्व संस्था, जसे संसद, न्यायपालिका आणि कार्यपालिका यांना जवळपास संपुष्टात आणले.’ इंदिरा गांधी यांनी बनावट आणिबाणी आणून स्वातंत्र्याची गळचेपी केली, भारतीय नागरिकांचा छळ केला, असेही काटजू यांनी म्हटले आहे.
माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या संदर्भात काटजू लिहितात, ‘ १९८४ मध्ये झालेले शिखांचे भयानक शिरकाण त्यांच्यावरील सर्वांत मोठा कलंक आहे. तसेच त्यांनी शाहबानो प्रकरणी न्यायालयाचा निर्णय निष्प्रभ केला. यासाठी त्यांना माफ केले जाऊच शकत नाही. केवळ मुस्लिम व्होटबँक वाचविण्यासाठी त्यांनी हा प्रकार केला.’ श्रीलंकेत भारतीय शांतिसेना पाठविण्याचा मूर्खपणाचा निर्णय घेऊन त्यांनी आपली राजकीय अपरिपक्वताच दाखविली आहे, असेही त्यांनी ब्लॉगवर नमूद केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23863

Posted by on Sep 18 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1458 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१७ सप्टेंबर] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६५ वा वाढदिवस आहे. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर यावर्षी त्यांचा हा ...

×