Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » उत्तराने समाधानी नाही, वचन पाळा

उत्तराने समाधानी नाही, वचन पाळा

=मायावती यांचा स्मृती इराणींवर हल्ला=
Mayawati4नवी दिल्ली, [२६ फेब्रुवारी] – बसपाच्या नेत्या मायावती आणि केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांच्यात आज शुक्रवारी राज्यसभेत पुन्हा जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. मायावती यांनी स्मृती इराणी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला, तर इराणी यांनीही त्याला तेवढेच जोरकस उत्तर दिले. स्मृती इराणी यांच्या उत्तराने आपले समाधान न झाल्यामुळे आपल्या शब्दाला जागत इराणी आता आपले शिर कापून देतील का, अशी विचारणाही मायावती यांनी करताच संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले.
रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या मुद्यावर राज्यसभेत बुधवारी चर्चा झाली होती. या चर्चेत बोलताना स्मृती इराणी यांनी आपल्या उत्तराने मायावती यांचे समाधान झाले नाही, तर आपले शिर कलम करण्याची तयारी दर्शवली होती. त्याचे स्मरण मायावती यांनी आज इराणी यांना करून दिले. इराणी यांनी आज रोहित वेमुलाच्या मुद्यावर सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर दिल्यानंतर मायावती उभ्या झाल्या आणि त्यांनी इराणी यांच्या उत्तरावर असमाधान व्यक्त केले. इराणी यांनी सभागृहाची दिशाभूल केली, या प्रकरणाच्या चौकशीसाठी ज्या न्यायाधीशांची नियुक्ती झाली ते दलित नाही. चौकशी समितीत एकही दलित नाही, असा आरोप करीत मायावती म्हणाल्या की, रोहितच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या लोकांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जातीच्या आधारावर भेदभाव केला जात नाही, असे स्मृती इराणी यांनी म्हटले, पण स्वातंत्र्यानंतर आजपर्यत देशात जातीच्या आधारावरच भेदभाव झाल्याचा आरोप करीत मायावती म्हणाल्या की, रोहित वेमुलाच्या लहान भावाला इराणी यांनी आपल्या मंत्रालयात नोकरी द्यायला हवी होती. रोहितच्या आईने आपल्या मुलाला नोकरी मिळावी म्हणून दिल्ली सरकारला विनंती केली होती. माझे सरकार असते, तर मी रोहितच्या लहान भावाला तातडीने नोकरी दिली असती.
माझ्या उत्तराने मायावती यांचे समाधान झाले नाही, तर माझे कलम करून मी त्यांच्या पायावर ठेवील, असे इराणी यांनी म्हटले होते, त्यांच्या उत्तराने माझे समाधान झाले नाही, आता इराणी आपले डोके कापून माझ्या मायावर ठेवणार का, अशी विचारणा करीत, मंत्र्यांनी अशी चुकीचे विधाने करायला नको, असे मायावती म्हणाल्या. यावर आपल्या जागेवरून उठत स्मृती इराणी म्हणाल्या की, हिंमत असेल, तर माझा शिरच्छेद करा, असे आव्हान मी बसपा कार्यकर्त्यांना दिले होते.
२४ फेब्रुवारीला इराणी यांची माझ्याबद्दल आणि अन्य विरोधी पक्षांबद्दलची वागणूक चांगली नव्हती. नंतर लॉबीत भेट झाल्यावर आपल्या वागणुकीबद्दल त्यांनी क्षमायाचना केली, त्यांच्यापेक्षा वयाने मोठी असल्यामुळे मी त्यांना माफ केले. पण सभागृहात मी आणि माझा पक्ष त्यांना माफ करणार नाही, असे मायावती म्हणाल्या. यावर मायावती यांना तत्काळ प्रत्युत्तर देत स्मृती इराणी संतप्तपणे म्हणाल्या की, लॉबीत मायावती माझ्याजवळ जे बोलल्या ते मी सांगितले, तर उत्तरप्रदेशात मायावती यांची अडचण होईल. हात जोडून मायावती मला म्हणाल्या, तुम्ही लोकसभेत जे उत्तर दिले, ते आधीच आम्हाला सांगितले असते, तर मी राज्यसभेत तुमच्यावर हल्ला चढवला नसता. माझा हात धरत मायावती म्हणाल्या, तुम्ही आधीच ही वस्तुस्थिती स्पष्ट केली असती, तर मी तुमच्याविरोधात राज्यसभेत नारेबाजी होऊ दिली नसती, जाऊ द्या, राजकारणात हे चालतच असते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26901

Posted by on Feb 27 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (810 of 2453 articles)


पायाभूत सुविधांवर प्रभूंचा भर प्रवासी, मालभाड्यात वाढ नाही तीन नव्या गाड्यांची घोषणा नवी दिल्ली, [२५ फेब्रुवारी] - रेल्वेमंत्री सुरेश ...

×