Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » एकटीने प्रवास करणार्‍या महिलांना रेल्वेत विशेष सुविधा

एकटीने प्रवास करणार्‍या महिलांना रेल्वेत विशेष सुविधा

=गर्भवतींना मिळणार ‘लोअर बर्थ’=
railway1नवी दिल्ली, [२६ मार्च] – रेल्वेगाड्यांमधून एकटीने प्रवास करणार्‍या महिलांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय रेल्वेनेही पुढाकार घेतला आहे. येत्या एक एप्रिलपासून रेल्वे आपल्या महिला प्रवाशांना स्वतंत्र बर्थ देणार आहे. रेल्वेगाड्यांमध्ये महिलांच्या विशेषत: एकटीने प्रवास करणार्‍या महिलांच्या सुरक्षेच्या गंभीर प्रश्‍नाला तोंड देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, याआधी घेण्यात आलेल्या विविध निर्णयांची अंमलबजावणीही एक एप्रिलपासून होणार आहे.
एकटीने प्रवास करणार्‍या सहा महिलांचा एक समूह तयार करण्यात येणार आहे. आरक्षित बोगीत सहा बर्थचा कुपे त्या सहा जणींना देण्यात येईल. पुरुष प्रवाशांना त्या बर्थवर बसण्याचीही परवानगी असणार नाही. अशा महिला प्रवाशांची सूचना तिकीट निरीक्षकांसह रेल्वेत तैनात पोलिस दलाच्या अधिकार्‍यांनाही देण्यात येणार आहे. याविषयी निर्देश जारी करण्यात आले असून नव्या व्यवस्थेअंतर्गत खालचा (लोअर) बर्थ गर्भवती महिला आणि वृद्ध व्यक्तींना देण्यात येणार आहे. मात्र, गर्भवती महिलांना त्यासाठी स्वतंत्रपणे माहिती अर्ज दाखल करावा लागेल. तिकीट निरीक्षकांना विशेषाधिकार देण्यात येणार असून खालचे बर्थ रिकामे होताच गरजूंना देण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला आहे. त्यासाठीच्या, निर्धारित कोट्यातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक कोचमध्ये दोन ऐवजी चार खालचे बर्थ देण्यात येतील. शिवाय, लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये असे आरक्षित बर्थ डब्याच्या साधारण मध्यावर येतील, अशा अंदाजाने देण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे संगणकीकृत आरक्षण यंत्रणेत ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीचे किंवा ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलेचे तिकीट आरक्षण आपोआपच खालच्या बर्थसाठी केले जाते. याव्यतिरिक्तही रिकाम्या राहिलेल्या खालच्या बर्थचे वाटप गरजेनुसार, शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तींना देण्याचे अधिकार तिकीट निरीक्षकांना दिले आहेत. रेल्वे आरक्षणाच्या नव्या नियमानुसार, प्रवासी चार महिने आधीच आरक्षण करू शकतील. मात्र, काही खास गाड्यांना हा नियम लागू राहणार नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21743

Posted by on Mar 27 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1843 of 2453 articles)


=बिहारसाठी मागितली आर्थिक मदत= नवी दिल्ली, [२६ मार्च] - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज गुरुवारी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ...

×