ऑस्कर नामाकंनांची घोषणा
Saturday, January 17th, 2015=‘द ग्रॅण्ड बुडापेस्ट हॉटेल’ आघाडीवर=
कॅलिफोर्निया, [१६ जानेवारी] – ८७ व्या ऑस्कर पुरस्कारांच्या नामांकनाची गुरुवारी औपचारिक घोषणा करण्यात आली. यात तब्बल नऊ नामांकनासह गुन्हेगारी जगतावर आधारित ‘द गॅ्रण्ड बुडापेस्ट हॉटेल’ आणि ‘बर्डमॅन’ हे चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.
त्याचप्रमाणे दुसर्या जागतिक युद्धावर आधारित असलेला ‘द इमिटेशन गेम’ या ब्रिटनच्या चित्रपटाला आठ आणि सत्य घटनेवर आधारित ‘अमेरिकन स्निपर’ व ‘बॉयहूड’ या चित्रपटांना प्रत्येकी सहा नामांकने मिळाली आहेत. द गॅ्रण्ड बुडापेस्ट हॉटेल, बर्डमॅन, द इमिटेशन गेम, अमेरिकन स्निपर, बॉयहूड, सेलमा, द थिअरी ऑफ एव्हरीथिंग आणि व्हिपलेश या चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे नामांकन देण्यात आले आहे.
बर्डमॅनचे दिग्दर्शक ऍलेजांद्रो गोन्सालिस इनारितू, बॉयहूडचे रिचर्ड लिंकलेटर, फॉक्सकॅचरचे बेनेट मिलर, द गॅ्रण्ड बुडापेस्ट हॉटेलचे ऍण्डरसन आणि द इमिटेशन गेमचे मॉर्टिन टिल्डम यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या यादीत नामांकन मिळाले आहे. बर्डमॅन चित्रपटात प्रमुख भूमिका पार पाडणारा अभिनेता मायकेल किटॉनला सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी नामांकन मिळाले आहे. त्याच्यासोबतच ऍलेने ट्युरिंग, ब्रॅडली कूपर, ऍडी रेडमॅन हेदेखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांसाठी असलेल्या पुरस्काराच्या शर्यतीत आहे.
याशिवाय, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या गटात गोल्डन ग्लोब विजेती ज्युलियन मूरे, मेरियन कोटिलार्ड, रीज विदरस्पून, फॅलिसिटी जोन्स आणि रूसामुंड पाईक यांच्यात जोरदार चुरस आहे. हॉलीवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये २२ फेब्रुवारी रोजी या वार्षिक ऑस्कर पुरस्काराचा शानदार वितरण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याचे सूत्रसंचालन नील पॅट्रिक्स हॅरिस करणार आहे.
Short URL: https://vrittabharati.in/?p=19770

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!