Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » ओसामा बिन लादेन जिवंतच

ओसामा बिन लादेन जिवंतच

=अमेरिकेच्या माजी गुप्तचर अधिकार्‍याचा दावा=
NSA whistleblower Edward Snowden: 'They're going to  say I aided our enemies' - video interviewनवी दिल्ली, [८ फेब्रुवारी] – अल् कायदा या जहाल आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला अमेरिकेच्या सील कमांडोंजच्या पथकाने पाकिस्तानात घुसून ठार मारले असले, तरी लादेन अजूनही जिवंत व तंदुरुस्त असल्याचा दावा अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएचा माजी अधिकारी एडवर्ड स्नोडन यांनी केला आहे.
मॉस्को ट्रिब्यून दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे. अमेरिकेवरील ९/११ च्या हल्ल्याचा सूत्रधार असलेला लादेन हा दीर्घकाळपर्यंत सीआयएचा एजंट राहिला आहे, अमेरिकेने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेसोबत मिळून त्याला मारल्याचे नाटक केले होते, मात्र तो जिवंत आहे आणि तसे पुरावेदेखील आपल्याकडे आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे. सध्या लादेन सीआयएच्या पे-रोलवर बहामासमध्ये राहात आहे. त्याला दरमहा ६७ लाख रुपये अर्थात १ लाख डॉलर इतकी रक्कम दिली जाते व ही रक्कम नकली संस्थांच्या माध्यमातून पाठविण्यात येते, असेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, सध्या लादेन कुठे आहे हे माहीत नसले, तरी २०१३ पर्यंत तो त्याच्या पाच पत्नी व मुलांसह एका बंगल्यात राहात होता, असेही स्नोडर यांनी सांगितले. या सर्व खुलाशांनंतर स्नोडर स्वतःदेखील २०१३ पासून फरारी असून, सध्या ते रशियामध्ये असल्याचे सूत्राकडून समजते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26806

Posted by on Feb 9 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (841 of 2458 articles)


=कलराज मिश्र यांची माहिती= अलाहाबाद, [८ फेब्रुवारी] - अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका ...

×