Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » कन्हैयाने देशद्रोही घोषणा दिल्या नाही: राहुल

कन्हैयाने देशद्रोही घोषणा दिल्या नाही: राहुल

=राहुल गांधींची लोकसभेत क्लीन चिट=
rahul gandhi slaped by bengluru studentsनवी दिल्ली, [२ मार्च] – जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा प्रमुख कन्हैया कुमारने देशाच्या विरोधात कोणत्याही घोषणा दिल्या नाहीत, या शब्दात आज बुधवारी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेतील आपल्या पहिल्या भाषणात त्याला क्लीन चिट दिली.
रोहित दलित आहे की नाही हा मुद्दा नाही, तर एका विद्यार्थ्याला आत्महत्येस बाध्य करण्यात आले, हा मुख्य मुद्दा आहे, असे स्पष्ट करत राहुल गांधी म्हणाले की, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील बहुतांश विद्यार्थी गरीब आहेत. रोहितही गरीब होता, त्यामुळेच सरकार त्याच्यामागे लागले, असा आरोपही त्यांनी केला. रोहितच्या आत्महत्येनंतर त्याच्या आईला मोदी यांनी एकही दूरध्वनी केला नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
सरकार विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा आणि गरिबांचा आवाज दडपू शकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मोदी सरकारच्या धोरणावर जोरदार हल्ला चढवताना राहुल गांधी म्हणाले की, महागाई कमी करण्याचे, देशातील तरुणांना रोजगार देण्याचे आश्‍वासन मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी दिले होते, पण यापैकी एकही आश्‍वासन त्यांनी पूर्ण केले नाही. महागाई नियंत्रणात आणण्यासाठीही सरकारने काहीच केले नाही, मोदी सरकारच्या कार्यकाळात तुरीची डाळ दोनशे रुपये झाल्याचा आरोप त्यांनी केला.
गेल्या दोन वर्षात पेट्रोलच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट झाली, पण त्याचा फायदा सर्वसामान्यांना नव्हे, तर उद्योगपतींना झाला, असा आरोप गांधी यांनी केला.
मोदी फक्त घोषणा करतात, जनतेला आश्‍वासनांच्या सापळ्यात अडकवतात, पण एकही आश्‍वासन पूर्ण करत नाहीत, असे गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातून भाजपा सदस्यांना वारंवार डिवचण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे भाजपा सदस्यांनीही त्यांच्या भाषणात अडथळा आणला.
काळ्या पैशाला पांढरा करण्याच्या योजनेची ‘फेयर ऍण्ड लव्हली’, तर ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाची ‘बब्बर शेर’, या शब्दांत राहुल गांधी यांनी खिल्ली उडवली. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मनरेगाची स्तुती केली, याकडे लक्ष वेधत गांधी म्हणाले की, हे तुम्ही मला नाही तर पंतप्रधान मोदी यांना सांगा. महात्मा गांधी आमचे आहेत, तर सावरकर तुमचे, असेही राहुल म्हणाले.
अंतरिम जामीन
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) परिसरातील घटनेप्रकरणी राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला विद्यार्थी संघटनेचा प्रमुख कन्हैया कुमार याला दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी सहा महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला.
९ फेब्रुवारीला अफजल गुरूच्या नावाखाली जेएनयू परिसरात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रविरोधी घोषणाबाजी केल्याचा कन्हैयावर आरोप आहे. हायकोर्टाने कन्हैयाला दहा हजार रुपयांच्या जाचमुचलक्यावर जामीन मंजूर केला. कन्हैयाने कधीही राष्ट्रविरोधी घोषणाबाजी केली नाही, असा युक्तिवाद त्याच्या वकिलाने केला होता. परंतु, कन्हैया कुमार तपासात सहकार्य करत नाही आणि इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) व दिल्ली पोलिसांनी केलेल्या संयुक्त तपासात त्याने परस्परविरोधी बयाण दिले, असा दावा पोलिसांनी केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कन्हैयाच्या जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26988

Posted by on Mar 3 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (781 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२ मार्च] - सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपले सरकार आवश्यक ती सर्वच पावले उचलण्यासोबत स्रोतांचा पुरवठाही ...

×