Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » कर्ज फेडा, अन्यथा कायदेशीर कारवाई

कर्ज फेडा, अन्यथा कायदेशीर कारवाई

=अरुण जेटली यांचा मल्ल्याला इशारा=
Arun Jaitley3नवी दिल्ली, [२८ मार्च] – बँकांचे कर्ज सन्मानपूर्वक परत करा अन्यथा कायदेशीर कारवाईला तयार राहा, असा सक्त इशारा विजय मल्ल्यांसारख्या जाणीवपूर्वक कर्ज बुडवणार्‍या सर्व लोकांना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिला आहे.
आपण कोणतीही वैयक्तिक टिप्पणी करीत नसून, मला वाटते की विजय मल्ल्यांसारख्या बड्या उद्योगसमूहांनी बँकांचे कर्ज फेडावे. हे त्यांचे कर्तव्य आहे. बँकेकडे मल्ल्यांची काही मालमत्ता तारण आहे आणि शिवाय नऊ हजार कोटी रुपयांहून अधिक कर्जाच्या वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. याशिवाय बँकेकडे काही सिक्युरिटीज असून बँक आणि अन्य संस्थांकडे कायदेशीर कारवाईद्वारे दबाव टाकण्याचे मार्ग आहेत त्यामुळे याप्रकरणी सध्या तपास सुरू आहे.
बर्‍याच काळापासून बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सचे सर्वेसर्वा मल्ल्या २ मार्च रोजी भारताबाहेर निघून गेले आणि ते आता लंडनमध्ये असल्याचे समजते. मल्ल्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून आपल्या उद्योग समुहाकरवी कर्ज वसुली संबंधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीपूर्वी काही दिवस आधी देश सोडला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27615

Posted by on Mar 29 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (559 of 2453 articles)


चंदीगढ, [२८ मार्च] - अनेक दिवसांपासून प्रस्तावित जाट आरक्षण विधेयकाला हरयाणा मंत्रिमंडळाने अखेरीस मंजुरी दिली आहे. हे विधेयक आजच विधानसभेत ...

×