Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » काट्याने काटा काढण्यात गैर काय?

काट्याने काटा काढण्यात गैर काय?

=संरक्षणमंत्री पर्रिकर यांचा सवाल, लष्करालाच आघाडीवर का पाठवायचे=
manohar-parrikar_759नवी दिल्ली, [२२ मे] – शेजारील देश परराष्ट्र धोरण म्हणून जर दहशतवादाचा स्वीकार करीत असेल, तर अतिरेक्यांचा कायमचा बिमोड करण्यासाठी अतिरेक्यांचाच वापर करण्यात गैर काय, असा स्पष्ट सवाल संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केला. ‘काट्याने काटा काढण्याची पद्धत तशीही फार जुनी आहे, असा सूचक इशाराही पर्रिकर यांनी दिला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत संरक्षण मंत्री बोलत होते. भारताच्या शेजारील देशांनी दहशतवाद हेच परराष्ट्र धोणर म्हणून स्वीकारले. भारताला अस्थिर करण्यासाठी त्यांच्याकडून दहशतवादाचा सातत्याने वापर केला जात आहे. अशा स्थितीत जर दहशतवाद कायमचा संपुष्टात आणण्यासाठी भारतानेही आपल्या गुप्तचर यंत्रणाच्या माध्यमातून काट्याने काटा काढण्याची पद्धत स्वीकारली, तर त्यात गैर काहीच नाही, असे पर्रिकर यांनी सांगितले.
अनेक अतिरेकी गट केवळ पैशाकरिता दहशतवाद पसरवित असतात. देश, प्रांत, धर्माशी त्यांचा काहीच संबंध नसतो. अशा गटांचा आपण वापर करण्यात काही चूक आहे, असे मला मुळीच वाटत नाही. प्रत्येकच वेळी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आपण आपल्या लष्करालाच आघाडीवर पाठविणे आवश्यक नाही. गुप्तचर यंत्रणांच्या माध्यमातून अतिरेक्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवणे आणि त्यांच्यात फूट पाडून त्यांना एकमेकांच्या हातून ठार मारण्याचे धोरण योग्य असेच असल्याचे पर्रिकर म्हणाले.
एका प्रश्‍नाच्या उत्तरात संरक्षण मंत्री म्हणाले की, गेल्या काही महिन्यात सीमेपलीकडून होणार्‍या गोळीबारात ३० टक्के घट झाली आहे. शिवाय २०१४ या एकाच वर्षात ११० अतिरेक्यांना यमसदनी धाडण्यात भारताला यश आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22640

Posted by on May 23 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1674 of 2453 articles)


=अमित शाह यांच्या हस्ते उद्‌घाटन, गडकरी करणार समारोप= कोल्हापूर, [२२ मे] - महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारिणी आणि राज्य परिषदेची बैठक ...

×