Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » कारणे दाखवा नोटीसला कीर्ती आझादांचे उत्तर

कारणे दाखवा नोटीसला कीर्ती आझादांचे उत्तर

नवी दिल्ली, [१ जानेवारी] – बेशिस्तीच्या आरोपाखाली भाजपाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीला पक्षाचे निलंबित खासदार कीर्ती आझाद यांनी आज शुक्रवारी आपले उत्तर सादर केले. दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेचा मुद्दा भाजपाशी संबंधित नसल्याने केंद्रीय मंत्री अरुण जेटली पक्षशिस्तीची ढाल वापरू शकत नाही, असे आझाद यांनी म्हटले आहे.
आपल्याला पक्षातून बडतर्फ का केले जाऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस भाजपाने बजावल्यानंतर पक्षाने केलेले सर्वच आरोप आझाद यांनी खोडून काढले. मी गेल्या नऊ वर्षांपासून दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेतील गैरव्यवहाराचा मुद्दा उचलून धरलेला आहे. आपण हा मुद्दा रेटू नये, असे भाजपातर्फे या काळात मला एकदाही सांगण्यात आले नाही. या प्रकरणी आरोप करताना मी कधीच जेटली किंवा भाजपाच्या कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नाही. त्यामुळे जेटली यांनी माझ्याबाबत इतके आक्रमक होण्याची गरजच नाही, असे त्यांनी भाजपाला सादर केलेल्या उत्तरात म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26356

Posted by on Jan 2 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (956 of 2452 articles)


=सुरेश प्रभूंनी अर्थ मंत्रालयाकडे मागितले ३२ हजार कोटी= नवी दिल्ली, [१ जानेवारी] - सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे आधीच आर्थिक समस्येत ...

×