Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » केंद्रीय योजनांना कात्री लागणार

केंद्रीय योजनांना कात्री लागणार

=७२ वरून ३० पर्यंत कमी करण्यावर नीती आयोगात एकमत=
niti aayogनवी दिल्ली, [२७ जून] – सध्या देशभरात राबविण्यात येत असलेल्या ७२ केंद्रीय योजनांना कात्री लावून त्यांची संख्या ३० वर आणण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाला बहुतेक सर्वच राज्य सरकारांनी सहमती दर्शविली आहे. यामुळे केंद्राच्या तिजोरीवरील आर्थिक बोजाही कमी होणार आहे.
नीती आयोगात राज्यांच्या उपसमितीच्या आज शनिवारी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत केंद्र प्रायोजित योजनांची संख्या कमी करण्याच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना उपसमितीचे संयोजक आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, सध्या केंद्राकडून राज्यांना महसुलात १० टक्के वाटा मिळतो. तो २५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची शिफारसही राज्यांनी केंद्र सरकारला केली आहे.
देशात अमलात आणल्या जाणार्‍या केंद्रीय योजनांची संख्या फार जास्त असल्याने त्याचा मोठा फटका तिजोरीला बसतो. योजना अर्ध्यापेक्षा जास्त प्रमाणात कमी करण्याबाबत आणि केवळ दोन प्रकारच्याच योजना असण्याबाबत बहुतेक सर्वच राज्यांमध्ये एकमत झाले. यातील पहिल्या प्रकारात केवळ राष्ट्रीय विकास अजेंड्याशी संबंधित महत्त्वपूर्ण योजना असतील. यात मनरेगा, स्वच्छ भारत अभियान आणि माध्यान्ह भोजन योजनेचा समावेश राहील. दुसर्‍या प्रकारात सामाजिक सुरक्षेशी संबंधित योजना असतील. या शिफारशींना ५ जुलैपर्यंत अंतिम रूप देण्यात येईल आणि सर्व सदस्यांची मान्यता मिळाल्यानंतर त्याबाबतचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करण्यात येईल, असे चौहान यांनी सांगितले.
आणखी काही सूचना प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेत एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ५ जुलैला या समितीची बैठक आहे. आज ज्या शिफारशी करण्यात आल्या, त्याच्या मसुद्यावर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाल्यानंतर अंतिम अहवाल तयार होईल आणि तो पंतप्रधानांकडे सोपविण्यात येईल. यापूर्वीच्या बैठकीच्या आधारे आजच्या बैठकीत मसुदा अहवाल सर्व सदस्यांना सादर करण्यात आला, असेही ते म्हणाले.
राजेंच्या ताफ्यातील कारला अपघात
दरम्यान, नीती आयोगाच्या बैठकीत उपस्थित राहाण्यासाठी दिल्ली विमानतळावर आगमन झाल्यानंतर बाहेर पडलेल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या ताफ्यातील एका कारची टीव्ही वाहिनीच्या वाहनाला धडक बसली. तथापि, यात कुणीही जखमी झाले नाही. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक मात्र काही वेळ विस्कळीत झाली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23113

Posted by on Jun 28 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1600 of 2453 articles)


=चीनची खोडी= नवी दिल्ली, [२७ जून] - एरवी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून भारतात घुसखोरी करणार्‍या चीनने आता मात्र चक्क भारतीय सागरी ...

×