Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » कॉंग्रेसने राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली

कॉंग्रेसने राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली

=रविशंकर प्रसाद यांचा आरोप=
ravi-shankar-prasad-2कोलकाता, [१९ एप्रिल] – लष्कर-ए-तोयबाची मानवी बॉम्ब असलेल्या इशरत जहॉं प्रकरणी तत्कालीन कॉंगे्रसप्रणीत संपुआ सरकारने निवडणूक फायद्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली होती, असा आरोप भाजपाचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी आज मंगळवारी येथे केला.
इशरतबाबतच्या पहिल्या शपथपत्राची आपल्याला कुठलीही माहिती नव्हती, असा दावा करून माजी गृहमंत्री पी. चिदम्बरम् यांनी खोटारडेपणाचा कळस गाठला होता. हा देशासोबतचा विश्‍वासघातच होता. चिदम्बरम् यांनी केवळ पहिल्याच नव्हे, तर दुसर्‍या शपथपत्रालाही मंजुरी दिली होती, ही सत्यता आता समोर आली असल्याने चिदम्बरम् किती खोटे बोलत आहेत, हे सिद्ध झाले आहे, असे प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पहिल्या शपथपत्रात काय होते? यात असा स्पष्ट उल्लेख होता की, इशरत जहॉं ही तोयबाच्या आत्मघाती पथकातील सदस्य असून, तिच्यासह अन्य अतिरेक्यांना ठार मारण्यात आले आहे. त्यांच्या खात्म्यामुळे मोठा धोका टळला असल्याने या चकमकीची सीबीआय चौकशी करण्याची गरज नाही. या प्रकरणातील दुसरे शपथपत्र समोर आले तेव्हा चिदम्बरम् यांनी तत्कालीन गृह सचिवांचा सल्ला बाजूला सारला आणि या चकमकीची सीबीआय चौकशी करता येऊ शकते, असा अभिप्राय दिला. सुरक्षा दलांचे मनोबल खचविण्यासोबतच अमित शाह आणि नरेंद्र मोदींना यात अडकविण्याचाच त्यांचा कट होता, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले.
स्वत: इशरतनेच तोयबाच्या वेबसाईटवर आपण मानवी बॉम्ब असल्याचा दावा केला होता. त्यानंतर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील एक सूत्रधार डेव्हिड हेडलीनेही ती तोयबाचीच मानवी बॉम्ब असल्याचा दावा केला होता. त्यामुळे केवळ राजकीय फायद्यासाठी कॉंगे्रसने राष्ट्रीय सुरक्षेसोबत तडजोड का केली होती, याबाबतचे स्पष्टीकरण या पक्षाला द्यावेच लागणार आहे, असेही ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27902

Posted by on Apr 20 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (466 of 2453 articles)


=लष्करी मुख्यालयात भव्य स्वागत= [gallery ids="27894,27895,27896"] बीजिंग, [१८ एप्रिल] - भारत आणि चीनमधील संबंध सुधारावे, यावरच आम्ही सातत्याने भर दिला ...

×