Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » खाण आणि खनिज विधेयकावर संसदेची मोहर

खाण आणि खनिज विधेयकावर संसदेची मोहर

=कोळसा विधेयक राज्यसभेत मंजूर, कॉंग्रेस, डावे वगळता सर्वच पक्षांची सरकारला साथ=
coalनवी दिल्ली, [२० मार्च] – खाण आणि खनिज विकास व नियमन दुरुस्ती विधेयक आज शुक्रवारी प्रचंड गदारोळात राज्यसभेत पारित करण्यात आले. त्यानंतर अवघ्या २० मिनिटांतच लोकसभेनेही त्याला मंजुरी दिली. यामुळे या दुसर्‍या महत्त्वाच्या सुधारणा विधेयकावर काही तासातच संसदेची मोहर उमटविण्यात सरकारला यश आले आहे. कॉंग्रेस आणि डावे पक्ष वगळता इतर सर्वच राजकीय पक्षांनी हे विधेयक पारित करण्यात सरकारला साथ दिली. तर, जदयु सदस्यांनी मतदानापूर्वीच सभात्याग केला. यानंतर काही वेळातच कोळसा खाण दुरुस्ती विधेयकही राज्यसभेत मंजूर करण्यात सरकारला यश आले.
खाण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी हे विधेयक सभागृहात सादर केले. त्यावर आक्षेप घेत कॉंगे्रस आणि डाव्यांनी जोरदार गोंधळ घातला. या गोंधळातही हे विधेयक मतदानासाठी ठेवण्यात आले. विधेयकाच्या बाजूने ११७ आणि विरोधात ६९ मते पडली. यापूर्वी विमा क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत वाढविणार्‍या पहिल्या महत्त्वाच्या सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळविण्यात सरकारला यश आले होते.
या विधेयकात राज्य सरकारांचे मत विचारात घेण्यात न आल्याने ते सभागृहाच्या सिलेक्ट समितीकडे पाठविण्यात यावे, अशा आशयाचा प्रस्ताव माकपचे पी. राजीव यांनी सादर केला. त्यावर बरीच चर्चा झाली. त्यानंतर मतदान सुरू झाले, तेव्हा अशा कामकाजात आम्हाला भाग घ्यायचा नाही, असे सांगून जदयु सदस्यांनी सभात्याग केला. कॉंग्रेस आणि डाव्या सदस्यांनी विरोधात मतदान केले. तर, तृणमूल कॉंगे्रस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, बसपा, बिजद, अण्णाद्रमुक, द्रमुक आणि झारखंड मुक्ती मोर्चा यासारख्या पक्षांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केले. सरकारने गेल्या वर्षी डिसेंबर आणि या वर्षीच्या जानेवारीत विमा आणि कोळसा विधेयकाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी अध्यादेश जारी केला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21634

Posted by on Mar 21 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1865 of 2453 articles)


=राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची माहिती= मुंबई, [२० मार्च] - येत्या शैक्षणिक वर्षापासून नॉन क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा वाढविण्यात येईल, असे सामाजिक ...

×