गरिबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध: पंतप्रधान
Tuesday, April 21st, 2015नवी दिल्ली, [१९ एप्रिल] – भाजपाप्रणीत रालोआचे केंद्र सरकार गरीब आणि शेतकर्यांच्या कल्याणासाठी, तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी येथे दिली.
अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या दुसर्या टप्प्यात लोकसभेच्या कामकाजाला उद्या सोमवार २० एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपा खासदारांच्या अभ्यासवर्गाला पंतप्रधान संबोधित करत होते. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू उपस्थित होते. भूमी अधिग्रहण अध्यादेशासह सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत जनतेत संभ्रम आणि संशयाचे वातावरण निर्माण करणार्या शक्तींवर पंतप्रधान मोदी यांनी यावेळी जोरदार हल्ला चढवला. या मुद्यांवर जनजागरण करण्याचे तसेच सरकारने आतापर्यंत केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले.
आपले सरकार जे निर्णय घेत आहे, ते राष्ट्रनीतीवर आधारित आहे, राजनीतीवर नाही, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, आपले सरकार गरिबांना घरे देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी शाळा आणि रुग्णालयांचीही व्यवस्था केली जाईल. गरिबांसाठी आखलेल्या कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी खासदारांना केले. महागाई आणि भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा आणि त्याला मिळालेल्या यशाचा आढावाही मोदी यांनी घेतला. शेतकर्यांसाठी सरकारने घेतलेल्या विविध कल्याणकारी निर्णयाचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, अतिवृष्टीने आता ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ऐवजी ३३ टक्के नुकसान झाल्यानंतरही शेतकर्यांना सरकारी मदत मिळणार आहे. पिकाची प्रतवारी न पाहता खरेदी करण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत. विविध कल्याणकारी योजनांची आपल्या मतदारसंघात नीट अंमलबजावणी होते की नाही, तसेच त्याचा लाभ गरिबांना मिळतो की नाही, यावर लक्ष ठेवण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी खासदारांना केले.
येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज तसेच परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधान मोदी यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
Short URL: https://vrittabharati.in/?p=22199

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!