Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » गाय राष्ट्रीय पशू जाहीर करा

गाय राष्ट्रीय पशू जाहीर करा

=रामदेव बाबा यांची मागणी=
baba_ramdevजोधपूर, [१६ सप्टेंबर] – हिंदू धर्मात गाय ही मातेसारखीच असल्याने तिला राष्ट्रीय पशू जाहीर करण्यात यावे, अशी मागणी प्रख्यात योगगुरू रामदेव बाबा यांनी केली आहे. काही राजकीय पक्षांनी मात्र या मागणीबाबत त्यांच्यावर टीका केली.
राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना दैनंदिन कामाचा तणाव कमी करून आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योगासनाचे धडे देत असलेले रामदेव बाबा जोधपूर येथे योगविद्येवर आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
आपले मत अधिक सक्षमपणे मांडण्यासाठी रामदेव बाबा यांनी कुराण आणि बायबलचा दाखला दिला. कुराण आणि बायबलमध्येही मांसाहार करणे हा गुन्हा असल्याचे स्पष्टपणे नमूद आहे. त्यातच गायीला आपल्या संस्कृतीत मातेचा दर्जा असल्याने गोमांस खाणे सर्वच धर्मात निषिद्ध मानले गेले आहे, असे सांगताना गाय राष्ट्रीय पशू घोषित करून सरकारने देशात गोहत्येवर बंदी आणावी, अशी मागणी त्यांनी केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23837

Posted by on Sep 17 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1464 of 2453 articles)


=बिहार विधानसभा निवडणूक, नामांकन प्रक्रिया सुरू= नवी दिल्ली, [१६ सप्टेंबर] - बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ...

×