Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » गुगलच्या नव्या सीएफओला ७ कोटी डॉलर्सचे पॅकेज

गुगलच्या नव्या सीएफओला ७ कोटी डॉलर्सचे पॅकेज

google-sign-9सॅन फ्रॅन्सिस्को, [२८ मार्च] – इंटरनेट क्षेत्रात आघाडीवर असलेल्या गुगलने आपले सीएफओ अर्थात मुख्य वित्त अधिकारी म्हणून रूथ पोराट यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या येत्या २६ मे पासून गुगलमध्ये दाखल होतील. गुगलमध्ये त्यांना सात कोटी डॉलर्सपेक्षा जास्त रकमेचे पॅकेज देण्यात आले आहे.
पोराट सध्या अमेरिकेतील आघाडीची बँक मॉर्गन स्टॅनलीमध्ये याच पदावर कार्यरत असून ती नोकरी सोडून येण्यासाठी गुगलने त्यांना सध्याच्या तुलनेत तब्बल सातपट पगार देऊ केला आहे. यावरूनच, गुगलसाठी रूथ किती महत्त्वाच्या आहेत हे स्पष्ट होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कंपनीत दाखल होताच, त्यांना कंपनीचे अडीच कोटी डॉलर्स मूल्याचे समभाग देण्यात येणार आहेत. त्यानंतर, येत्या चार वर्षात कंपनी त्यांना आणखी चार कोटी रुपयांचे समभाग प्रदान करणार आहे. त्याशिवाय, कंपनी त्यांना ५० लाख डॉलर्सचा ‘सायनिंग बोनस’ही देणार आहे. ही रक्कम त्यांच्या साडे सहा कोटी डॉलर्सच्या पहिल्या पगारात जोडण्यात येणार आहे. मॉर्गन स्टॅनली कंपनीने त्यांना २०१३ मध्ये दहा लाख डॉलर प्रति महिना याप्रमाणे साधारण एक कोटी डॉलर्सचे पॅकेज देऊ केले होते.
कोण आहेत रुथ पोराट?
ब्रिटनमधील मँचेस्टरमध्ये जन्मलेल्या रूथ किशोरवयात अमेरिकेत गेल्या आणि त्यांना अमेरिकेचे नागरिकत्वही मिळाले. स्टॅनफर्ड विद्यापीठातून स्नातक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्च पदवी, तर व्यवस्थापन विषयातील स्नातकोत्तर पदवीही घेणार्‍या पोराट राजकारणातही सक्रिय आहेत. क्लिटंन कुटुंबाच्या निकटवर्ती मानल्या जाणार्‍या पोराट यांनी २००८ मध्ये अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी क्लिटंन यांचा जोरदार प्रचार केला होता. न्यूयॉर्कच्या इकॉनॉमिक्स क्लब मंडळाच्या विश्‍वस्त असलेल्या पोराट यांचे नाव २०११ मध्ये फोर्ब्जच्या जगातील सर्वाधिक प्रभावशाली महिलांच्या यादीतही समाविष्ट करण्यात आले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21789

Posted by on Mar 29 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1841 of 2458 articles)


=राष्ट्रपती मुखर्जींनी निवासस्थानी जाऊन केला गौरव, देशभरात जल्लोष= नवी दिल्ली, [२७ मार्च] - माजी पंतप्रधान, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, ...

×