Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अफजलचा वाढदिवस

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अफजलचा वाढदिवस

jnu_delhiनवी दिल्ली, [११ फेब्रुवारी] – काश्मीरच्या स्वातंत्र्यापर्यंत लढू, असे म्हणत ‘हमें चाहिये आझादी, हर हाल में चाहिये आझादी, भारत की बर्बादी’, अशा घोषणाबाजी पाकिस्तानात नाही तर भारतातच देण्यात आल्याने येथे खळबळ उडाली आहे. देशात नेहमी चर्चेत असलेले नामांकित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात या भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या, हे विशेष.
संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी अफजल गुरू याच्या फाशीला एकवर्ष पूर्ण होत असल्याने त्याच्या फाशीचा विरोध म्हणून भारत विरोधी घोषणाबाजी जेएनयू कॅम्पसमध्ये करण्यात आली. कल्चरल इव्हिनिंगच्या नावाने कार्यक्रमाची परवानगी मागून ९ फेब्रुवारीला अफझल गुरूच्या समर्थनार्थ आणि भारतविरोधी नारे लावणे हा चिंतेचा विषय आहे. विद्यार्थ्यांच्या या घोषणेवर सर्व स्तरातून टीका होत आहे.
यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या संघटनांमध्ये वादही झाला. दरम्यान, याप्रकरणाची आता पोलिस चौकशी सुरू असून व्हिडीओ फुटेज तपासण्यात येत असल्याचे समजते.
कृत्य देशद्रोही : कॉंग्रेस
अतिरेक्याचा वाढदिवस साजरा करणार्‍याना देशद्रोही ठरवित कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी आज गुरुवारी येथे केली. येथील पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.
जेएनयुसह प्रेस क्लब ऑफ इंडियात कायद्याचे उल्लंघन झाले असेल तर दिल्ली पोलिसांना नियंत्रणात ठेवणार्‍या मोदी सरकारने कडक कारवाई केली पाहिजे, असे ते म्हणाले.
जे लोक अतिरेक्याचा वाढदिवस साजरा करतात, ते देशद्रोही आहेत, असे कॉंग्रेस मानते, असे सांगून ते पुढे म्हणाले की, आमच्या पक्षाने अतिरेक्यांच्या विरोधात कडक कारवाई केली असून आपले अनेक नेते व कार्यकर्ते गमावले आहेत. त्यामुळे राष्ट्रभक्तीबाबत आम्हाला कोणी ज्ञान शिकवू नये.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26820

Posted by on Feb 12 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (833 of 2453 articles)


नवी दिल्ली, [११ फेब्रुवारी] - दब गया जिस्म हिम तले पर बची रही जान ए हिंद के वीर तुझपे सौ ...

×